Dainik Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. २४ एप्रिल) पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या महागाई विरोधात आणि केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणाविरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले. तसेच पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले.
याप्रसंगी मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ प्रभारी तथा पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, महिला तालुकाध्यक्ष जयश्रीताई पवार, अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष आफताब सय्यद, संपर्कप्रमुख विजय शिंदे, उपाध्यक्ष माणिक गाडे, ज्येष्ठ नेते बारकूभाऊ ढोरे, कामशेत शहर अध्यक्ष संतोष वीर, युवक अध्यक्ष सूरज पुरी, तळेगाव युवक अध्यक्ष प्रतिक जांभळे, संदिप लोहोर, अनिल खांदवे, योगेश करवंदे, महेश सावंत, महादू लोंढे, राहील तांबोळी, मंगेश गावडे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षाच्या निचांकी पातळीवर (प्रति बॅरल ६५.४१ डॉलर) आहेत. यापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये किंमत प्रति बॅरल ६३.४० डॉलर होती. या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहे. रेटिंग एजन्सी नुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रतिलिटर १२-१५ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ६-१२ रुपये नफा कमावित आहेत. तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत, सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशाची लूट करत आहे, असे सांगत या धोरणाविरोधात मावळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार