व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 24, 2025
in लोकल
ECI

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत.

Novel NIBR Ads

आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत दर तासाला सरासरी 58 लाख मतदारांनी मतदान केले. तथापि, शेवटच्या दोन तासांत अपेक्षित 116 लाखांच्या तुलनेत केवळ 65 लाख मतदारांनी मतदान केले, हे लक्षवेधी असले तरी त्यावरून कोणत्याही गैरप्रकाराचा निष्कर्ष काढता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.

प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून मतदानानंतर कोणतीही तक्रार अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निरीक्षकांकडे नोंदवण्यात आलेली नाही.

मतदार यादी संदर्भात आयोगाने सांगितले की, 1950 च्या लोकप्रतिनिधी अधिनियम व 1960 च्या मतदार नोंदणी नियमांनुसार तयार केली जाते. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि अंतिम यादी सर्व पक्षांना उपलब्ध यादी करून दिली जाते.

याशिवाय, अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ 90 अपीले करण्यात आली, जी एकूण मतदार संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही कोणतीही मोठी तक्रार नोंदवलेली नाही.

Novel NIBR Ads

मतदान प्रक्रियेत 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर 97,325 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व सर्व पक्षांकडून 1,03,727 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमले गेले होते. यामध्ये काँग्रेसच्या 27,099 बीएलएचा समावेश होता. त्यामुळे मतदार यादी संदर्भातील आरोप पूर्णपणे निराधार असून कायद्याचा अवमान करणारे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

24 डिसेंबर,2024 रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेसला लेखी उत्तर दिले असून, ही माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. तरीही पुन्हा पुन्हा असे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे अयोग्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


dainik maval jahirat

Previous Post

चांगला निर्णय ! व्यायामशाळा विकास अनुदान मर्यादा 7 लाखांवरून 14 लाख रुपये

Next Post

पेट्रोल, डिझेल, गॅसची महागाई… केंद्राच्या महागाईच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा ‘एल्गार’ मोर्चा । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Petrol diesel gas inflation NCP Sharad Pawar party march against Center Govt inflationary policy

पेट्रोल, डिझेल, गॅसची महागाई... केंद्राच्या महागाईच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 'एल्गार' मोर्चा । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.