Dainik Maval News : कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक अन् प्रभावी उमेदवार आशाताई बाबुराव (आप्पा) वायकर आणि पंचायत समिती कार्ला गणाच्या उमेदवार रंजनाताई सुरेशशेठ (दादा) गायकवाड यांच्या सौजन्याने भव्य छकडी बैलगाडा स्पर्धेचे वेहेरगाव येथे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी ( दि. १८ डिसेंबर) रोजी ही भव्य स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या मोठ्या दिमाखात संपन्न झाली.
उत्साह, शिस्त आणि जल्लोषपूर्ण वातावरणात छकडी बैलगाडा स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. यावेळी स्वतः आशाताई वायकर यांनी उपस्थित राहून छकडी बैलगाडा स्पर्धेचा आनंद घेतला. ग्रामीण जीवनाला आधार देणारी छकडी बैलगाडा स्पर्धा आजही पारंपरिक पद्धतीने पार पाडली जाते. बैलगाड्यांचा थरारक वेग, चालकांचे कसब आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता.
ही स्पर्धा केवळ मनोरंजन नव्हे, तर शेतकरी संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण एकतेचे जिवंत प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया आशाताई वायकर यांनी दैनिक मावळसोबत बोलताना दिली. यावेळी माजी सभापती बाबुराव (आप्पा) वायकर, सुरेशशेठ (दादा) गायकवाड आणि कार्ला पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजनाताई सुरेशशेठ ( दादा) गायकवाड आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना टू – व्हीलर व ट्रॉफी, रोख रक्कम व ट्रॉफी अशी विविध बक्षिसे वाटप करण्यात आली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

