व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Lonavala : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : उर्वरित दोन जागांसाठी शनिवारी मतदान, प्रशासन सज्ज

लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उर्वरित दोन जागांसाठी शनिवारी (दि. २० डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 19, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala Municipal Council General Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उर्वरित दोन जागांसाठी शनिवारी (दि. २० डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

लोणावळा नगरपरिषदेच्या एकूण २७ जागांपैकी यापूर्वीच तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित २२ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, दोन प्रभागांतील जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली होती. त्यानुसार गवळीवाडा प्रभाग क्रमांक १० अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) आणि नांगरगाव प्रभाग क्रमांक ५ ब (सर्वसाधारण) या दोन जागांसाठी आता मतदान होत आहे.

गवळीवाडा येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होत आहे. तर नांगरगाव येथे एका जागेसाठी अपक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा मिळून तीन उमेदवार रिंगणात आहेत. या दोन जागांसाठीचा प्रचार गुरुवारी (दि. १८) संपला असून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी, सभा आणि प्रचार फेऱ्यांद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकडे लागले आहे.

मतदानासाठी एकूण आठ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नांगरगाव प्रभागासाठी रेल्वे ज्ञानदीप्ती स्कूल, लोणावळा नगरपरिषद लोकमान्य टिळक विद्यालय आणि नांगरगाव अग्निशमन केंद्र येथे मतदान केंद्र असतील. तर, गवळीवाडा प्रभागात गवळीवाडा शाळा क्रमांक सहा, पुणे वनविभाग विश्रामगृह खंडाळा, व्हिपीएस हायस्कूल लोणावळा आदी ठिकाणी मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत.

मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली असून कर्मचारी, पोलीस बंदोबस्त आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी (दि. २१) लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय इमारतीमधील वाहनतळाच्या जागेत मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

नगरपरिषदेच्या जिथे सार्वत्रिक निवडणूक तिथे शनिवारी सार्वजनिक सुट्टी – जिल्हाधिकारी

Next Post

Photo : वेहेरगाव येथे आशाताई वायकर आयोजित भव्य छकडी बैलगाडा स्पर्धा जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Photo grand Chhakdi bullock cart competition organized by Ashatai Waikar at Vehergaon

Photo : वेहेरगाव येथे आशाताई वायकर आयोजित भव्य छकडी बैलगाडा स्पर्धा जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.