व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘हा लढा हुकुमशाही आणि एकाधिकारशाही विरोधातला.. मावळमधून संजोग वाघेरे यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचंच’

देशात सध्या केंद्रात असलेल्या भाजपा सरकारकडून सुरू असलेली हुकुमशाही आणि एकाधिकारशाही या विरुध्द काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढा देण्याचे काम सुरू आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
PCMC-Mahavikas-Aghadi-Sanjog-Waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशात सध्या केंद्रात असलेल्या भाजपा सरकारकडून सुरू असलेली हुकुमशाही आणि एकाधिकारशाही या विरुध्द काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढा देण्याचे काम सुरू आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य मतदाराने देशात परिवर्तनाचा निश्चय केलेला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात देखील संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करून इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा खासदार दिल्लीत पाठवू, असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ शहर कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पिंपरीतील खराळवाडीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यासह काँग्रेसचे माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक बाबू नायर, अशोक मोरे, शामलाताई सोनावणे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Pimpri Chinchwad Mahavikas Aghadi meeting Maval Lok Sabha candidate Sanjog Waghere )

डॉ. कैलास कदम यांनी देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून व राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपले नेते भाजप विरोधात लढत आहे. त्यांना बळ देण्याची व प्रत्येक जागेवर आपल्या आघाडीचा उमेदवार विजयी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे नमूद केले. तसेच, बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या विविध जबाबदा-यांचे वाटप यावेळी करण्यात आले.

ही लढाई आपणच जिंकणार – संजोग वाघेरे पाटील
“पिंपरी चिंचवड शहरात विविध पदांवर व राजकीय जबाबदा-या पार असताना काँग्रेस पक्षासोबत काम केले आहे. मागच्या काळात महागाई, बेरोजगारी, कामगारांच्या प्रश्नावर, तसेच शहरातील विविध मुद्द्यांवर काँग्रेससोबत रस्त्यावर उतरून आपण आंदोलने केली. आपली सर्वांची लढाई देश हिताची, तसेच कष्टकरी, कामगार, सामान्य माणसाच्या न्यायासाठी आहे. सर्व मिळून लढणार आणि आपणच जिंकणार आहोत,” असा विश्वास यावेळी महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– हिंदू नववर्षानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य बाईक रॅली । Vadgaon Maval
– लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत लोणावळ्यामधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश । Maval Lok Sabha
– मोठी कारवाई! पुणे जिल्ह्यात ‘या’ दोन ठिकाणी 65 लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त । Pune News


Previous Post

मावळमधील कामशेत शहरात ‘पाणीबाणी’ । Kamshet News

Next Post

शिरगाव येथील गावठी दारूअड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shirgaon-Police-Station

शिरगाव येथील गावठी दारूअड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.