पवन मावळ – नाणे नावळ भागातील नागरिकांच्या साठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत शहरात सध्या पाणीबाणी असल्याचे चित्र दिसत आहे. कामशेत शहरातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. तसेच काही ठिकाणी शरीरास हानीकारक अशा अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असून त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
आधीच तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याची गरज नेहमीपेक्षा अधिक वाढली आहे. परंतू दोन-दोन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेबाबत ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीये. कामशेतच्या अनेक भागात दुषित म्हणजेच गढूळ पाणी येत आहे. अशा पाण्यावर अनेकदा तवंग दिसून आला आहे. अशा पाण्याने आरोग्याच्या समस्या तोंड वर काढू शकतात. ( Water Supply Problem Is Serious Issue In Kamshet CIty of Maval Taluka )
ह्या आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आलीये. परंतू विकतचे पाणी परवडत नसल्याचे नागरिक सांगतायते. त्यात ज्या व्यवसायिकांचा पाण्याचा व्यवसाय आहे, ते चढ्या दऱाने पाणी विकत असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत. त्यामुळे आता संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर हंडा मोर्चा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत लोणावळ्यामधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश । Maval Lok Sabha
– मोठी कारवाई! पुणे जिल्ह्यात ‘या’ दोन ठिकाणी 65 लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त । Pune News
– ‘आम्हीच बनवलेल्या रस्त्यांवरून येऊन आम्हाला शिव्या घालू नका.. बारणे 3 लाख मताधिक्याने विजयी होतील’ – उदय सामंत