व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, November 13, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट… पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला प्लॅन

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची दिनांक 12 मे 2023 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 7, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
kishor-aware

Photo Courtesy : Team Dainik Maval


जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची दिनांक 12 मे 2023 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. आवारे यांच्या हत्येने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यांच्याच हत्येचा बदला घेण्याचा कट रचून मावळ तालुक्यात पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत असलेल्या गुंडांच्या मोठ्या टोळीला अटक करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपींचा प्लॅन सपशेल उधळून लावला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट एका टोळीने रचला होता. परंतू पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने त्यांचा कट पूर्ण होण्यापूर्वीच उधळला आहे. तसेच या प्रकरणी नव्याने 5 आणि पूर्वीचे 2 असे एकूण 7 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 5 सराईत गुन्हेगारांकडून 7 पिस्तूले आणि 21 जिंवत काडतूसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ( Pimpri Chinchwad police arrested five accused who were plotting to avenge Kishor Aware Murder )

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दहा दिवसांपूर्वीच टोळीचा प्रमुख प्रमोद सोपान सांडभोर (वय 33, रा. हरणेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे) आणि त्याचा साथीदार शरद मुरलीधर साळवी (वय 30, रा. धनगरबाबा मंदिरामागे काळेवाडी, पिंपरी) यांना गजाआड केले होते. त्यांच्याकडून 4 पिस्तूले आणि 14 काडतूसे जप्त केली होती. त्यांच्या चौकशीत ते इतर 5 साथीदारांसह आवारेंच्या खूनाचा बदला घेण्याचा कटात सामील होते. पण हे दोघे पकडले गेल्याने हा कट उघड झाला आणि पोलिसांनी पुढील तपासात त्यांचे बाकीचे पाच साथीदार यांच्याही मुसक्या आवळल्या.

अमित जयप्रकाश परदेशी (वय 31, रा. तळेगाव दाभाडे), मंगेश भीमराव मोरे (वय 30, रा. वडगाव मावळ), अनिल वसंत पवार (वय 39, रा. तळेगाव दाभाडे), अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी (वय 28, रा. तळेगाव दाभाडे), देवराज (रा. जळगाव जामोद, बुलडाणा) अशी आता पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक केलेले सर्व आरोपी हे पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, अहमदनगर, तळेगाव दाभाडे, कामशेत, कोपरगाव, चाकण, वडगाव पोलिस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमवून गाड्यांची तोडफोड करून जाळपोळ करणे, बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणे असे 26 गुन्हे दाखल आहेत.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही? मावळातील डी. वाय. पाटील कॉलेजच्या प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप
– झोपण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अंथरुण दहावेळा चेक कराल..! हातावरुन काहीतरी गेले म्हणून बघितले आणि धक्काच बसला


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मीच निवडणूक लढवणार – खासदार श्रीरंग बारणे

Next Post

इंद्रायणीच्या डोहात सापडलेल्या नवविवाहितेच्या मृत्यूचे गुढ उकलले! नवराच निघाला आरोपी…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
girl-dies-after-drowning

इंद्रायणीच्या डोहात सापडलेल्या नवविवाहितेच्या मृत्यूचे गुढ उकलले! नवराच निघाला आरोपी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune District Collector Jitendra Dudi

महत्वाची बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी – वाचा सविस्तर

November 12, 2025
Chief Minister Devendra Fadnavis makes a surprise visit to the historical fort Lohagad in Maval taluka

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगडाला अचानक भेट । CM Devendra Fadanvis At Lohgad

November 12, 2025
Container enters Warkari Dindi in Khamshet one woman Warkari dies 10 injured Kamshet Warkari Accident

खामशेत येथे वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला कंटेनर, एका महिला वारकरीचा मृत्यू, 10 जण जखमी । Kamshet Warkari Accident

November 12, 2025
Pune District Collector Jitendra Dudi reviewed the preparations of the Municipality and Municipal Council

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा । Pune News

November 12, 2025
Indori - Varale Zilla Parishad Group All eyes on MLA Sunil Shelke decision

आमदार सुनील शेळके यांचा “तो” शब्द इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाला देखील लागू होणार का? mla sunil shelke

November 11, 2025
Will the Takve-Nane Zilla Parishad group in Maval taluka get leadership of highly educated Dr Ashok Date

मावळ तालुक्यातील टाकवे-नाणे जिल्हा परिषद गटाला मिळणार उच्चशिक्षित डॉक्टरांचे नेतृत्व ? Dr Ashok Date

November 11, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.