पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मे महिन्यात (May 2024) पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ( पक्के ड्रायव्हिंग लायसन्स ) शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन –
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे २ व ३ मे, मंचर येथे ६ व ७ मे, जुन्नर येथे १५ व १६ मे, वडगाव मावळ येथे २० व २१ मे तर लोणावळा येथे २७ व २८ मे या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. ( Pimpri Chinchwad RTO Monthly Visit Time Table For May 2024 Read in Details )
अर्ज कसा करावा –
शिकाऊ अनुज्ञप्ती काढून 30 दिवस झाल्यानंतर पक्क्या अनुज्ञप्तीच्या वाहन चालविण्याच्या चाचणी परिक्षेकरिता अर्ज करु शकतो.
आवश्यक कागदपत्रे –
– नमुना 4 (Form 4)
– शिकाऊ अनुज्ञप्ती
– नजीकच्या कालावधीत काढलेले तीन फोटो.
– वयाचा आणि पत्त्याचा केंद्रिय मोटार वाहन नियम 4 नुसार पुरावा.
– परिवहन संवर्गातील वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटार ट्रेनिंग स्कूलचे नमुना 5 मधील प्रमाण्पत्र.
– शुल्क्
– ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे.
चाचणी परिक्षा –
वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पार केल्यानंतर चालकास परवाना दिला जाईल. जर चालक वाहनचालक चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधी नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो.
अधिक वाचा –
– महिंद्रा कंपनीकडून तळेगावमधील ॲड. पु. वा. परांजपे शाळेला ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन’ची मदत । Talegaon Dabhade
– ‘धर्मराज्य’ पक्षाकडून महेश ठाकूर यांनी भरला मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज, कोण आहेत महेश ठाकूर? जाणून घ्या । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरिक्षक म्हणून विवेकानंद सिंग यांची नियुक्ती । Maval Lok Sabha