व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

४ देशी बनावटीच्या पिस्टल सह एकूण १० लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 13, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सोमाटणे फाटा परिसरात सापळा रचून पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ४ देशी बनावटीची पिस्टल, ७ जिवंत काडतुसे आणि एक आलिशान कार असा एकूण १० लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील अवैध शस्त्रांच्या तस्करीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार सरदार सय्यद हा आपल्या साथीदारांसह तळेगाव दाभाडे परिसरातील सोमाटणे फाटा येथे शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

सदर माहितीच्या आधारे १० मार्च २०२६ रोजी पोलिसांनी निर्जनस्थळी सापळा रचला आणि एका मारुती सुझुकी फ्रॉन्स कारला वेढा घालून तीन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये १) सरदार अकबर सय्यद (वय २०, रा. तळेगाव दाभाडे), २) विशाल नाना कुडेकर (वय ३५, रा. खेड, पुणे) आणि ३) प्रशांत बबुशा सोनवणे (वय २८, रा. चेंबूर, मुंबई) यांचा समावेश आहे.

सुरुवातीला त्यांच्याकडून ३ पिस्टल आणि ६ काडतुसे मिळाली होती. मात्र, अधिक तपासादरम्यान आरोपी प्रशांत सोनवणे याच्याकडून आणखी १ पिस्टल आणि १ काडतूस हस्तगत करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ४ पिस्टल आणि ७ जिवंत काडतुसे जप्त करून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या शस्त्रांच्या तस्करीचे धागेदोरे मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले आहेत. मुख्य आरोपी सरदार सय्यद याने ही शस्त्रे मध्यप्रदेशातील उमरटी येथील गुरुसिंग नावाच्या आरोपीकडून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस आता मध्यप्रदेशातील त्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, अटकेत असलेला सरदार सय्यद हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी आणि ‘मोक्का’ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. (Arms Trafficking Gang Arrested) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, स.पो.नि. गोरक्षनाथ बालवडकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांच्या चोख कामगिरीमुळे शहरातील एक मोठी संभाव्य दुर्घटना टळली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड 


Previous Post

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

Next Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.