होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन, गेस्टम्प कंपनी चाकण आणि ग्रामपंचायत म्हाळुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 600 देशी झाडांची लागवड करण्यात आली. अत्यंत चांगल्या दर्जाची 5 फुटी कडुलिंब, आपटा, वड, पिंपळ, जांभूळ, फणस, गुलमोहर, आवळा अशा विविध प्रकारची झाडे संस्थेतर्फे देण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गेस्टम्प कंपनीचे सीएसआर विभागाचे प्रमुख एचआर विशाल भणगे यांच्या हस्ते कडुनिंबाचे रोप लावून अभियानाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित गेस्टॅम्प कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनचे सर्व सदस्य, स्थानिक महिला-भगिनी आणि ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, कर्मचारी यांच्या हस्ते रोपे लावण्यात आली.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. युनियन लीडर अमित येळवंडे म्हणाले की, झाडे लावले म्हणजे काम झाले असे नाही. ही झाडे जगणे महत्त्वाचे आहे. झाडांची काळजी आपण सर्वजण घेऊयात. नक्कीच वृक्षारोपणाचा खऱ्या अर्थाने सर्व ग्रामस्थांना फायदा होईल. सरपंच अर्चना महाळुंगकर यांनी ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले. याही पुढे आपण सहकार्य करावे अशी विनंती केली. तसेच झाडांची काळजी आम्ही घेऊ असे त्यांनी आश्वासन दिले.
अधिक वाचा –
– 18व्या लोकसभेची स्थापना, ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, राहुल गांधी विरोधी पक्ष नेता, संसदेने पाहिला दुर्मिळ प्रसंग
– तळेगाव दाभाडे येथे आणखीन एका युवकाला पिस्तूलासह अटक । Talegaon Dabhade
– संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील 278 लाभार्थ्यांना लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप । Vadgaon Maval