पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरया प्रतिष्ठान च्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष मयूर प्रकाश ढोरे यांच्या वतीने मावळ तालुक्यातील विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य जनतेसाठी पीएमपीएमएल बस पास सेवा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पन सोहोळ्याला स्वतः जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, पीएमपीएमएलचे चीप ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. ( PMPML Bus Pass Service Center Started In Maval Vadgaon City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यात पीएमपीएमएल ची बस सेवा निगडी-वडगाव मावळ, निगडी-लोणावळा, निगडी ते टाकवे, निगडी ते नवलाख उंब्रे, निगडी ते उर्से, निगडी ते गहुंजे या मार्गावर चालू असते. त्यातच वडगाव शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, पोलीस ठाणे, विविध शासकीय कार्यालये, बँका, शैक्षणिक संस्था आहेत. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण येथील शासकीय कार्यालये, उद्योग व्यवसाय, शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग व्यावसायिक, विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना कामासाठी ये-जा करावी लागते.
अनेक कर्मचारी वडगावात राहत असून, तालुक्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी इतर नागरिक बसने प्रवास करत असतात. या सर्वांना सवलतीचा पास घेण्यासाठी निगडी येथे जावे लागत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय व अर्थिक नुकसान होत असल्याने आता या नवीन झालेल्या पास केंद्रामुळे तालुक्यातील नागरिकांचा सवलत पास साठी जाणारा वेळ, अर्थिक नुकसान तसेच गैरसोय थांबणार आहे.
हेही वाचा – वडगाव फाट्यावरील सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या परिसरात भीषण आग; आपदा मित्राच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात
बाबुराव आप्पा वायकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी स्वखर्चातून दिलेल्या या पास केंद्राचा तालुक्यासह वडगाव शहरातील विद्यार्थी, कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक ते सर्वसामान्य जनतेला कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.
हेही वाचा – मावळ तालुका हादरला..! शिरगाव गावचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांची भरचौकात हत्या
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, पीएमपीएमएल चे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, निगडी पास विभाग प्रमुख नितीन घोगरे, डेपो मॅनेजर शांताराम वाघिरे, वाहतूक नियोजन अधिकारी वर्पे, आंदर मावळ प्रवासी संघ अध्यक्ष राजू शिंदे, वाहतूक नियोजन अधिकारी विजय रांजणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम असवले, नगरसेवक मंगेश खैरे, वडगाव शहर काँग्रेस आय अध्यक्ष गोरख ढोरे, वडगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अतुल वायकर;
सामाजिक कार्यकर्ते बारकू ढोरे, दिलीप वहिले, चंदुकाका ढोरे, अर्जुन ढोरे, नितीन भांबळ, सुरेश कुडे, कार्याध्यक्ष सुरेश जांभुळकर, युवा उद्योजक युवराज ढोरे, उपाध्यक्ष सोमनाथ भोसले, उद्योजक सचिन कडू, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहर ओबीसी सेल अध्यक्ष मयूर गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष प्रणव ढोरे, युवा उद्योजक यश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ धोंगडे, गौतम सोनवणे, गिरीष सावले आणि वडगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या कारवाईचा धडाका सुरूच; डीजेच्या तालावर अश्लील नृत्य सुरु असलेल्या बंगल्यावर मध्यरात्री टाकला छापा
– बेबडओहोळ गावात घरोघरी येणार जलगंगा; तब्बल 4 कोटी 91 लाखाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन