व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहराजवळ अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांना पोलिसांचा दणका, हॉटेल मालकासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime News

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 18, 2024
in लोकल, शहर
lonavala-police

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. तसेच सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागातील सर्व आस्थापना चालक यांनी त्यांना नेमून दिलेल्या नियमांचे आणि आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहनही केले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आल्याने कार्तिक यांच्या पथकाने कारवाई सुरु केली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत एका हॉटेलमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्याआधारे दिनांक 16 मार्च 2024 रोजी मध्यरात्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह त्या हॉटेलवर कारवाई केली. तेव्हा हॉटेलचालक सदरचे हॉटेलमधेच अवैध हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना अवैधपणे हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे मिळून आले. त्यामुळे त्याठिकाणी विक्रीसाठी असलेला हुकक्यासाठी लागणारे सर्व मुद्देमाल एकूण 44 हजार 790 रुपये जप्त करण्यात आला. ( police crackdown on illegal hookah parlors in lonavala case registered against 3 persons )

पोलिस नाईक सचिन गायकवाड यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे 3 जणांविरोधात सिगारेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वित्तरण, विनीमय) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) व 21 (अ) सह भादवि कलम 188, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोसई शुभम चव्हाण, पोसई रोहन पाटील, पोलिस हवालदार अंकुश नायकुडे, पो.ना. सचिन गायकवाड, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अंकुश पवार, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ काळे, पो.कॉ टकले, पो.कॉ माळवे, पो.कॉ पवार, म.पोकॉ चवरे, म.पोकॉ शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू, महाराष्ट्रात लोकसभा उमेदवाराला 95 लाख इतकी खर्चाची मर्यादा
– ‘मावळ लोकसभा निवडणूकीत संजोग वाघेरे भरघोस मतांनी विजयी होणार!’ मावळसाठी इंडिया आघाडीने कंबर कसली
– पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना, नव्या परिमंडळाची निर्मिती, कोणते पोलिस ठाणे कोणत्या परिमंडळात? पाहा


Previous Post

वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला सरकारची मान्यता, अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
temple-pune

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.