लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खडकाळे येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये काहीजण अवैधरित्या जुगार अड्डा चालवत आहेत आणि त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी रविवारी (दि. 18) रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. तेव्हा मौजे खडकाळे मधील नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये जुगार अड्डा चालवणारा एजंट व जुगार खेळणारे असे एकूण 10 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. (Police raid illegal gambling den near Kamshet 10 people detained valuables worth 11 lakhs seized)
त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, गाड्या व मोबाईल फोन असा एकूण 11,43,470 रूप्ये (अक्षरी अकरा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तर) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत पो.कॉ रहिस मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादिवरून कामशेत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद 10 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशन चे पोसई शुभम चव्हाण करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पो.कॉ रहिस मुलाणी यांचे पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ उत्साहात; वन्यजीव रक्षक निलेश गराडे यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार । Talegaon Dabhade
– मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 पैकी 10 जागा बिनविरोध, 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात । Maval Taluka Kharedi Vikri Sangh
– पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, ‘या’ लोकल गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक । Mega Block on Pune Lonavala Railway Route