Dainik Maval News : लोणावळा शहर पोलिसांनी लोणावळा शहर हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई करीत सदरचे अड्डे बंद केले आहेत. पोलिसांनी एकूण तीन मटका अड्ड्यांवर छापा टाकून 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच सहा हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्या ताब्यातील चौदाशे रुपयांच्या चाळीस मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण फुगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये किरण राजु जाधव (वय ३२ वर्षे,) विकास भिमाजी पैलवान (वय ३२, दोघे रा. गवळीवाडी लोणावळा), वैभव भगवान साठे (वय २५ वर्ष ,रा. ओळकाईवाडी, कुसगाव ता. मावळ जि.) आणि अशोक जगन्नाथ फाळके (रा.आण्णाभाऊ वसाहत सिद्धार्थनगर, लोणावळा) या चौघांना तीन वेगवेगळ्या अड्ड्यावर लोकांकडुन पैसे घेवुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना ताब्यात घेतले. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कारवाई मध्ये राजु प्रभाकर जाधव (वय ५० वर्षे, रा. गावठाण खंडाळा, लोणावळा) याला बेकायदा बिगर देशी दारू विक्री करीत असताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम क 65 (ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवाईमध्ये पोलीस हवालदार राहुल पवार, पोलीस कर्मचारी रमेश उगले आणि पवन कराड आदींनी सहभाग घेतला. पोलीस हवालदार मयूर अबनावे यांनी हे गुन्हे दाखल करून घेतले. पोलीस हवालदार शकील शेख, म्हेत्रे, व पोलीस नाईक शिंदे हे पुढील तपास करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड


