राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारसोबत भांडणारे आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्यातील गावागावातील मराठा समाजाकडून पाठींबा मिळत आहे. अनेक गावांत साखळी उपोषण करण्यात येत आहे, तर अनेक ठिकाणी जरांगेंच्या सभांना तोबा गर्दी होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक गावांमध्ये जोवर मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोवर कुठल्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात एन्ट्री करू द्यायची नाही, असा निर्णय स्थानिक मराठा बांधवांनी घेतल्याचे दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातही कातवी गाव येथील सकल मराठा समाजाच्या सर्व पदाधिकारींनी, ‘जोवर मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तसा निर्णय होत नाही, तोवर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावात येऊ नये, जर कुणीही आरक्षणाच्या निर्णयाच्या शिवाय गावात प्रवेश केला तर त्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहिल,’ असे निवेदन वजा पत्र तहसीलदार महोदय यांना कातवी गावातील मराठा बांधवांनी दिली आहे. ह्यासह मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेत्यांना गावात प्रवेश नाकारणारे, कातवी हे मावळ तालुक्यातील पहिलेच गाव ठरले आहे. ( Political party leaders were given no entry in Katvi village of Maval taluka for Maratha reservation )
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येतो? जाणून घ्या सविस्तर…
– अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी