Dainik Maval News : सध्या जवळपास प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन आला आहे. स्मार्टफोनमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापराचे प्रमाण देखील वाढले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा अतिवापर हा तसा धोकादायकच. परंतु योग्यरितीने जर या प्लॅटफॉर्म्सचा वापर केला, तर त्यातून खुप काही चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. तळेगाव दाभाडे येथील जगनाडे मायलेकींनी देखील आपल्या कृतीतून हे करून दाखविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सध्या देशात कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे प्रकरण प्रचंड गाजत आहे. सोबतच काल परवा घडलेलं बदलापूर येथील दोन चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे आहे. समाजातील या गंभीर घटना पाहून तळेगाव दाभाडे शहरातील पुजा अमोल जगनाडे यांचे मन व्यथित झाले. समाजातील प्रत्येक घटकाला या गोष्टींचा विचार करून त्याबद्दल व्यक्त करायला लावले पाहिजे, यासाठी जनजागृती करायला पाहिजे, असे त्यांनी ठरविले आणि त्यातूनच त्यांना एक कल्पना सुचली.
सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या संख्येने नागरिक जोडलेले आहेत. इन्स्टाग्रामवरील रिल्स पाहण्यात वेळ कसा जातो हे कुणाच्याही लक्षात येत नाही. पुजा जगनाडे यांनी इन्स्टाग्रामवर एक समाज प्रबोधन करणारा व्हिडिओ टाकण्याचे ठरविले. काल, सोमवारी रक्षाबंधन हा सण होता. या सणाचे औचित्यसाधून त्यांनी एका फलकावर समाजमनाचा ठाव घेणार संदेश लिहिला. “जसं स्वतःच्या बहिणीचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. तसंच दुसऱ्यांच्या बहिणीचं भक्षकांपासून रक्षण करणे आपले कर्तव्य आहे… हो ना ?” असा संदेश असलेला फलक घेऊन पुजा अमोल जगनाडे आणि त्यांची लेक स्वरा अमोल जगनाडे या दोघीही तळेगाव दाभाडे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभ्या राहिल्या.
चौकातून जाणारे येणारे हजारो लोक हा फलक आणि मायलेकींना पाहून थांबत होते. वाचत होते, विचार करत होते आणि तेव्हाच पुजा यांना आपली कृती सफल झाल्याचे समाधान लाभले. यानंतर आमदार सुनिल शेळके यांचीही त्यांनी भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी या दोन्ही माय लेकींच्या उपक्रमाचे कौतूक केले. सोबतच पुजा जगनाडे यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. समाजातील सध्याची परिस्थिती पाहता, प्रत्येकानेच मुलींच्या संरक्षणासाठी पुढे आले पाहिजे, याकरिता विचार करायला लावणारा उपक्रम राबविल्याबद्दल पुजा जगनाडे आणि त्यांच्या लेकीला टीम ‘दैनिक मावळ’चा सलाम. ( Pooja Jaganade Swara Jaganade Mother Daughter Public awareness about violence against girls Talegaon Dabhade )
पाहा व्हिडिओ –
View this post on Instagram
View this post on Instagram
अधिक वाचा –
– येळसे येथील प्राथमिक शाळेत मावळ तालुक्यातील पहिला स्किल स्कूल शाळा प्रकल्प सुरू । Pavananagar News
– लोणावळ्यासह मावळ तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे : आयपीएस सत्यसाई कार्तिक । Lonavala News
– शिष्यवृत्ती परीक्षेतील चमकदार कामगिरीसाठी कान्हे शाळेतील विद्यार्थी हिंदूराज कुटे याचा जिल्हास्तरावर गौरव । Maval News