श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या ‘श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’ ट्रस्टचे अध्यक्ष पोपटराव खोमणे यांचा मावळ तालुका रामोशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. ( poptrao khomane president of shri martand devasthan jejuri felicitated by maval taluka ramoshi sanghatana )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्री मार्तंड देवस्थान जेजुरी ट्रस्टच्या विश्वस्त पदाचा वाद अखेर संपुष्ठात आला. विश्वस्तांची संख्या 7 वरुन 11 करण्याचा निर्णय मान्य झाला आणि 7 मध्ये आणखीन 4 स्थानिकांची निवड करण्याचे धर्मादाय आयुक्तांनी मान्य केले. हा संपूर्ण वाद सोडवण्यात पोपटराव खोमणे यांचा मोलाचा वाटा होता.
पोपटराव खोमणे हे श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर मावळ तालुका रामोशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. यात आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका संघटनेचे अध्यक्ष भाऊ साहेब चव्हाण, उपाध्यक्ष सुमित चुकाटे, सचिव शाम भाऊ लांडगे, कार्याध्यक्ष लक्ष्मण चव्हाण आदी जण यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘इंद्रपुरी’तील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण । MLA Sunil Shelke
– अखेर प्रयत्नांना यश!! पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आणखीन 2 डब्यांची जोड, रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आनंद