उद्या सोमवारी अर्थात 13 मे रोजी पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरुर आणि मावळ लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. पुणे आणि शिरूर मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास पुणे शहर पोलीस सहआयुक्त प्रविण पवार यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ तसेच शिरुर मतदार संघातील शिरुर व हडपसर विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या आदेशान्वये मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या ४८ तास अगोदर पासून बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ( Prevention of illegal mobs in the wake of Lok Sabha elections Pune News )
अधिक वाचा –
– अभिनंदन ! युरोपातील रोमानिया देशात विशेष प्रशिक्षणासाठी पाठण्यात येणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये क्षितिजा मरागजे हिची निवड
– तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ! जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने एकविरा विद्यालयाचे प्रांगण पुन्हा गजबजले
– दुःखद ! गहुंजे येथे 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू । Maval News