व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आज जागतिक मातृदिन, कधी आणि कशी झाली मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात? नक्की वाचा मातृदिनाचा इतिहास । Happy Mother’s Day 2024

महत्वाचे म्हणजे मदर्स डे या दिवशी केवळ आईलाच नव्हे तर आपल्या आयुष्यात आईची भूमिका बजावणाऱ्या, आपली काळजी घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे आभार मानले पाहिजेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 12, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Mother's Day MatruDin

Photo Courtesy : File Image (Online)


Happy Mother’s Day 2024 : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी । आई – माता – माऊली हिची महती आणि थोरपणा काय आहे, तो या एका ओळीतून समजून जातो. या विश्वाचे दर्शन घडवणारी आणि आपलं पालण पोषण करून स्वतःच्या पायावर उभं करणारी माता, हिचा गौरव हा दररोज झाला पाहिजे, यात काही शंका नाही. छत्रपती शिवरायांनी तर आई म्हणजे देवघरातील देवता, अशीच शिकवण आपल्याला दिली आहे. तरीही 21व्या शतकात मातेचा गौरव आणि तिच्या समर्पणाचे आभार मानण्यासाठी वर्षातील एक दिवस निश्चित केला आहे, तो म्हणजेच मदर्स डे अर्थात मातृदिन. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

जगभरातील मातांचे योगदान आणि समर्पणाबद्दल आभार मानण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस 12 मे रोजी साजरा केला जात आहे. या दिवसाच्या निमित्ताने आईला वंदन करणे, तिचे आभार मानने, तिला भेटवस्तू देणे असं काही केलं जातं. पण ह्या दिवसाची सुरुवात नक्की कशी झाली? हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर काळजी करू नका., दैनिक मावळचा आजचा हा खास लेख फक्त मातृदिन समजून घेण्यासाठीच आहे… ( History of celebrating Mother’s Day )

अशी झाली मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात –
मातृ दिवस साजरा करण्याची सुरुवात ॲना रीव्हज जार्विस यांनी केली होती. यामागची कथा अशी की, या दिवसाद्वारे अ‍ॅनाला तिची आई ॲना रीव्हस जार्विस यांना श्रद्धांजली वाहायची होती. तिच्या आईने गृहयुद्धाच्या काळात कार्यकर्ता म्हणून काम केले होते. त्या जेव्हा 1904 मध्ये मरण पावल्या, तेव्हा अॅनाने आईच्या मृत्यूच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त वेस्ट व्हर्जिनियामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये माता झालेल्या इतर स्त्रियांना पांढरे कार्नेशन, आईचे आवडते फूल भेट दिले. यानंतर त्यांनी ठरवले की दरवर्षी मदर्स डे साजरा केला जावा, त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. शेवटी 1914 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. अशा प्रकारे मदर्स डे अर्थात मातृदिन साजरा करण्याची सुरुवात झाली.

आई या शब्दासोबत अनेक भावना जोडलेल्या आहेत. माया, ममता, आपुलकी, विश्वास, काळजी अशा कित्येक गोष्टीं या आई पणात सामावलेल्या असतात. कोणताही स्वार्थ किंवा इच्छा न ठेवता आई आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी समर्पित करते. आईच्या त्यागाची आणि योगदानाची परतफेड करण्याचा आपण कितीही प्रयत्न केला, तरीही ते शक्य नाही. त्यामुळे आयुष्यभर तिला वंदन करणे आणि तिच्याप्रती कृतज्ञ राहणे, तिच्या ऋणात राहणे, हेच आवश्यक.

महत्वाचे म्हणजे मदर्स डे या दिवशी केवळ आईलाच नव्हे तर आपल्या आयुष्यात आईची भूमिका बजावणाऱ्या, आपली काळजी घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे आभार मानले पाहिजेत.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ! जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने एकविरा विद्यालयाचे प्रांगण पुन्हा गजबजले
– दुःखद ! गहुंजे येथे 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू । Maval News
– वारं फिरलं… आणि एकतर्फी वाटणारी मावळ लोकसभेची निवडणूक अखेर चुरशीची झाली ! Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

डॉ. डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसने दिला सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश । Maval News

Next Post

मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जमावास प्रतिबंध । Lok Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ECI

मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जमावास प्रतिबंध । Lok Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.