Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा अर्थसंकल्प, मावळ लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी बैठकीत आढावा घेतला. आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळमधील कोथुर्णे, काळे कॉलनी, दारुंब्रे-लोहार वस्ती-साळूंब्रे ते चांदखेड हा रस्ता, सांगवडे ते नेरे, सांगवडे ते संत तुकाराम साखर कारखाना दरम्यानचा रस्ता, ब्राम्होणली या रस्त्यांची कामे पूर्णात्वाकडे आली आहेत. शिल्लक कामे तत्काळ पूर्ण करावीत. रस्ता नागरिकांसाठी खुला करावा. देहू, येलवाडी या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे.
- लोणावळा येथील टायगर, लायन्स पाॅंइंट येथील स्काय वॉकच्या कामाला गती द्यावी. आई एकविरा देवी मंदिर परिसरात प्रशस्त वाहनतळ विकसित करावे. डोंगरावरील हेलीपॅड, वेहरगाव पासून जाणारा पालखी मार्गाचा रस्त्याचा कामाला वेग द्यावा. तिकोणा, तुंग, राजमाची, लोहगड या चार किल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यातून किल्यांकडे जाणारे रस्ते, पाणी, स्वच्छतागृहाची कामे पूर्ण करावीत. पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.
एमएसआरडीच्या माध्यमातून जुना राष्ट्रीय महामार्ग (चार) हा राज्य सरकारला देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे. या महामार्गावरील कान्हे, कार्ला फाटा, वडगाव, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, सेंट्रल देहूरोड येथील वाहतूक कोंडी सोडवावी. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएसआरडीए आणि पीएमआरडीएची संयुक्त बैठक घ्यावी. त्यानुसार येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात. सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे.
- वाकड, भूमकर चौकाकडून मारुंजीकडे जाणा-या रस्त्यावीरल लक्ष्मी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी मारुंजी गाव ते आल्हाट कॉलेज रस्ता विकसित करावा. पीएमआरडीएची वेबसाईट बंद आहे. ती तत्काळ सुरु करावी. लाभधारकांना ६.२५ टक्के मोबादला दिला जात आहे. १०६ लाभधारक आहेत. ७ लाभधारकांना लाभ दिला आहे. ५३ प्रकरणे निकाली काढली आहेत. उर्वरित तत्काळ निकाली काढावीत.
पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती द्या
पवना, इंद्रायणी नदी सुधारचे काम हाती घ्यावे. लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी, देहू, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करावेत. इंद्रायणीनदी लगत असलेल्या ३८ आणि पवना नदी काठच्या १८ गावात एसटीपी उभारले जाणार आहेत. इंद्रायणीसाठी ६७१ कोटी तर पवनासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याची कार्यवाही पीएमआरडीएने सुरु करावी. नदी स्वच्छतेसाठी तत्काळ पाऊले उचलावीत. याबाबत मी देखील पाठपुरावा करत असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates