व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तुंग, तिकोणा, राजमाची, लोहगड किल्ल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद ; गडाचे रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे आदी कामे लागणार मार्गी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा अर्थसंकल्प, मावळ लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी बैठकीत आढावा घेतला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 10, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
MP Shrirang Barne PMRDA Meeting

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चा अर्थसंकल्प, मावळ लोकसभा मतदारसंघातील रस्ते, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी बैठकीत आढावा घेतला. आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Novel NIBR Ads

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळमधील कोथुर्णे, काळे कॉलनी, दारुंब्रे-लोहार वस्ती-साळूंब्रे ते चांदखेड हा रस्ता, सांगवडे ते नेरे, सांगवडे ते संत तुकाराम साखर कारखाना दरम्यानचा रस्ता, ब्राम्होणली या रस्त्यांची कामे पूर्णात्वाकडे आली आहेत. शिल्लक कामे तत्काळ पूर्ण करावीत. रस्ता नागरिकांसाठी खुला करावा. देहू, येलवाडी या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे.

  • लोणावळा येथील टायगर, लायन्स पाॅंइंट येथील स्काय वॉकच्या कामाला गती द्यावी. आई एकविरा देवी मंदिर परिसरात प्रशस्त वाहनतळ विकसित करावे. डोंगरावरील हेलीपॅड, वेहरगाव पासून जाणारा पालखी मार्गाचा रस्त्याचा कामाला वेग द्यावा. तिकोणा, तुंग, राजमाची, लोहगड या चार किल्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यातून किल्यांकडे जाणारे रस्ते, पाणी, स्वच्छतागृहाची कामे पूर्ण करावीत. पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

एमएसआरडीच्या माध्यमातून जुना राष्ट्रीय महामार्ग (चार) हा राज्य सरकारला देखभाल दुरुस्तीसाठी दिला आहे. या महामार्गावरील कान्हे, कार्ला फाटा, वडगाव, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, सेंट्रल देहूरोड येथील वाहतूक कोंडी सोडवावी. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएसआरडीए आणि पीएमआरडीएची संयुक्त बैठक घ्यावी. त्यानुसार येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात. सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे.

  • वाकड, भूमकर चौकाकडून मारुंजीकडे जाणा-या रस्त्यावीरल लक्ष्मी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी मारुंजी गाव ते आल्हाट कॉलेज रस्ता विकसित करावा. पीएमआरडीएची वेबसाईट बंद आहे. ती तत्काळ सुरु करावी. लाभधारकांना ६.२५ टक्के मोबादला दिला जात आहे. १०६ लाभधारक आहेत. ७ लाभधारकांना लाभ दिला आहे. ५३ प्रकरणे निकाली काढली आहेत. उर्वरित तत्काळ निकाली काढावीत.

पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती द्या
पवना, इंद्रायणी नदी सुधारचे काम हाती घ्यावे. लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी, देहू, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करावेत. इंद्रायणीनदी लगत असलेल्या ३८ आणि पवना नदी काठच्या १८ गावात एसटीपी उभारले जाणार आहेत. इंद्रायणीसाठी ६७१ कोटी तर पवनासाठी २१८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याची कार्यवाही पीएमआरडीएने सुरु करावी. नदी स्वच्छतेसाठी तत्काळ पाऊले उचलावीत. याबाबत मी देखील पाठपुरावा करत असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

Next Post

टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – खासदार श्रीरंग बारणे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MP Shrirang Barne held meeting with municipal officials regarding various issues in Pimpri Chinchwad city

टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - खासदार श्रीरंग बारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.