Dainik Maval News : मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज समाधीवर विधिवत पूजाअर्चा करत चंदन उटीतून लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मक गणेशाचे रूप साकारण्यात आले.
गुढीपाडव्यानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर विविध रंगी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. तसेच सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
- चंदन उटीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर साकारलेली गिरीजात्मकाची आकर्षक अशी उटी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. हे गणरायाचे रूप अभिजीत धोंडफळे व सहकारी यांनी संजीवन समाधी वर साकारले.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर श्री गिरीजात्मजाचे मनोहर रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade