व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 12 महत्त्वाचे कायदे मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री यांनी अधिवेशनाच्या यशस्वीतेबद्दल सर्व आमदार, मंत्री, पिठासीन अधिकारी, विधानमंडळ कर्मचारी आणि माध्यमांचे आभार मानले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 31, 2025
in महाराष्ट्र
cm Devendra Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 12 महत्त्वाचे कायदे मंजूर करण्यात आले असून, दरदिवशी सरासरी 9 तास कामकाज चालले. राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली. सरकारने चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विरोधी पक्षालाही त्यांच्या मुद्द्यांसाठी संपूर्ण संधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या अधिवेशनात महत्वाच्या विधेयकांमध्ये माथाडी कामगार कायद्यातील सुधारणा विधेयकाचा समावेश असून या विधेयकामुळे बनावट माथाडी आणि ब्लॅकमेलिंग रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक विधेयक आणि विनियोजन विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके संमत करण्यात आली. या अधिवेशनात संविधानावर विशेष चर्चा झाली, तसेच अर्थमंत्री यांनी शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर आधारित अर्थसंकल्प सादर केला आहे, जो महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल.

  • मुख्यमंत्री यांनी अधिवेशनाच्या यशस्वीतेबद्दल सर्व आमदार, मंत्री, पिठासीन अधिकारी, विधानमंडळ कर्मचारी आणि माध्यमांचे आभार मानले.

तेरा कोटी लोकांच्या विकासाचा अर्थसकंल्प – उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,सर्व कल्याणकारी योजना सुरू ठेवून अर्थव्यवस्था बिघडू न देता अर्थसकंल्प सादर केला. राज्यातील 13 कोटी लोकांच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केला. विकासाचे आणि लोकाभिमुख प्रकल्प शासन राबवित आहे. शेतकरी, कष्टकरी , कामगार वर्ग या सर्व घटकांचा विचार राज्य चालवताना करत आहोत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना पुढे नेताना सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करित आहोत. परकीय गुंतवणूक वाढविण्यातही राज्य अग्रेसर असून, दाओस येथे झालेल्या परिषदेत 15 लाख कोटीचे करार करण्यात आले. एक खिडकी योजनेअंतर्गत राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. स्टार्ट अपमध्ये राज्य अव्वल असून, आपल्या राज्यावर इतर राज्यांच्या तुलनेत कर्जही कमी आहे. शंभर दिवसांच्या कामकाजाचे उद्दिष्ट मुख्यमंत्री यांनी सर्व विभागांना दिले होते, त्यानुसार सर्व विभागांनी उत्तम काम पार पाडले असून, अनेक विभागांनी उद्दिष्ट पुर्ण केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

सलग सुट्ट्यांमुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी । Maval News

Next Post

मराठी नववर्ष व गुढीपाडवा निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधीवर चंदन उटीतून साकारले ‘गिरीजात्मक गणेश’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Puja on occasion of Gudi Padwa at Shri Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Temple in Alandi

मराठी नववर्ष व गुढीपाडवा निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधीवर चंदन उटीतून साकारले ‘गिरीजात्मक गणेश’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka BJP Meeting Speech by Ramdas Kakade Bala Bhegde Present

“कार्यकर्त्याला भावासारखा जपला पाहिजे; टाळी द्या, पण फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला द्या” ; काकडे यांचा भेगडेंना सल्ला, राजकीय वर्तुळात चर्चा

August 10, 2026
Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

August 10, 2026
World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

PHOTOS : मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.