Dainik Maval News : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली झाली आहे. डॉ. सुहास दिवसे यांच्या जागी आता जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुहास दिवसे यांचे प्रमोशन झाले आहे. सुहास दिवसे यांची जमावबंदी आयुक्त आणि संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात सरकार बदलल्यानंतर प्रशासनात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आतापर्यंत अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे. दिवसे यांसह पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचीही बदली करण्यात आली आहे. पाटील यांची बदली साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी गुरुवारी (दि.२) पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला.
कोण आहेत जितेंद्र डूडी ?
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन 2019 ते 2020 या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, पुणे तर सांगली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे.
श्री. डूडी यांच्या सेवा कालावधीत पोषण अभियानातंर्गत 5 व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात अधिकाधिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात तृतीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय मतदान दिन 2024 च्यावेळी पुणे विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रथम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News