व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यातील दोन प्राध्यापकांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित । Lonavala News

लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मल्हारी नागटिळक आणि प्रा. संदीप लबडे यांच्या संशोधन गटाने हे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 4, 2025
in मावळकट्टा, लोकल, शहर
Research papers of two professors from Lonavala published in an international journal

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधकांनी प्रयोगशाळेत उन्नत स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञान, मॉलिक्युलर डाकिंग, सिमुलेशन आणि डीएफटी पद्धतींचा वापर करून मानवी शरीरातील रक्तात असलेल्या सिरम अल्ब्युमिन प्रथिनासोबत अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकाची होणारी आंतरक्रिया उलगडली आहे. या संशोधनासंदर्भातला शोधनिबंध नुकतेच नेदरलँड येथून प्रकाशित होणाऱ्या “एल्सवेअर-जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड, इम्पॅक्ट फॅक्टर ५.३” या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.

प्राध्यापक डॉ. रंजना जाधव व डॉ. शकुंतला सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मल्हारी नागटिळक आणि प्रा. संदीप लबडे यांच्या संशोधन गटाने हे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या संशोधनासाठी डॉ. टॉम चेरीयन (कन्नूर विद्यापीठ, केरळ), डॉ. सतीश पवार (सोलापूर विद्यापीठ), डॉ. किरण लोखंडे आणि डॉ. तन्वीर वाणी (किंग सौद युनिव्हर्सिटी, सौदी अरेबिया) यांनी मोलाचे सहकार्य केले. या शोधनिबंधाची दखल आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांद्वारे घेतली गेली आहे, ज्यामुळे लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामधील प्राध्यापकांच्या नावाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे.

लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी डॉ. मल्हारी नागटिळक आणि प्रा. संदीप लबडे यांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या

Next Post

आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
com maharashtra devendra fadanvis

आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.