Dainik Maval News : मावळ तालुक्यात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होत आहे. शेतीपूरक व्यवसायातून तरुणांनी आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिंगबर दुर्गाडे यांनी केले. मावळमधील कृषी पर्यटन केंद्राची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जेष्ठ संचालक माऊली दाभाडे, रेवनाथ दारवटकर, दत्तात्रय येळे, अनिरुद्ध देसाई, बबनराव भोंगाडे, गुलाबराव खांदवे, निरज पवार आदी उपस्थित होते.
मावळ तालुक्यात कृषी पर्यटन, पोल्ट्री, दुग्ध व्यवसाय, पॉली हाऊस आदी व्यवसायाने मोठा रोजगार निर्माण झाला आहे. तालुक्यातील तरुणांना यामुळे रोजगारासाठी जिल्हा बँक कर्जपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दुर्गाडे यांनी सांगितले. जेष्ठ संचालक माऊली दाभाडे यांनी तालुक्यातील विविध शेतीपूरक व्यवसायाची सविस्तर माहिती देऊन व्यवसाय वाढीसाठी उपाययोजनांची चर्चा केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : नेतृत्व कायम, पण संचालक मंडळात मोठ्या बदलांचे संकेत । Sant Tukaram Sugar Factory Election
– सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल ; लोणावळा पोलिसांकडून शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली । Pune News