Dainik Maval News : राजस्थानी बांधवांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आले आहे. पुणे – जोधपुर एक्सप्रेस तीन मे पासून दररोज धावणार आहे. यामुळे लोणावळा, पुणे, मुंबई परिसरामध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या राजस्थानी बांधवांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी आणि गावाकडून पुन्हा इकडे येण्यासाठी वाहतूक व्यवस्था सोयीची झाली आहे.
- शनिवारी लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये ही गाडी आली असता राजस्थानी बांधवांनी गाडीच्या इंजिनची पूजा केली, तसेच गाडीचे चालक आणि गार्ड यांचा चिक्की व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, मांगीलाल जैन, ललित ओसवाल, ललित सिसोदिया, महेंद्र ओसवाल, भरत भाई कुमावत, भरत ओसवाल, रमेश शेठ राठोड, संतोष चोरडिया, नारायण शेठ पुरोहित, रामदेव बाबा भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सदरची गाडी सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजस्थान पालीचे खासदार पी. पी. चौधरी, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे देखील यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News