लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्यांविरोधात आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना कामशेत बाजारपेठमध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला इ. ची अवैधपणे विक्री होत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यावरून गुरुवारी, दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभाग आणि कामशेत पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने सापळा रचून कारवाई केली. ज्यात कामशेत बाजारपेठेतील 1) भरत चंपालाल जैन यांच्या मे. शिवम टेडर्स (पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत) या दुकानाच्या गोडाउनमधून तसेच, 2) घिसाराम सुखराज चौधरी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत येथील मेट्रो मेडीकलच्या बाजूस असलेल्या किराणा दुकानामधून आणि राहत्या घरातून आणि 3) महावीर सुखराज जैन यांच्या भोला ट्रेडर्स (पत्ता – छत्रपती संभाजी महाराज चौक, कामशेत) या दुकानामधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला इ. पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावर मिळून आला.
संबंधितांवर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि. कलम 328, 272, 273 सह अन्नसुरक्षा मानके कायदा, 2006 चे कलम 59 आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमूद कारवाईत वर नमूद तिन्ही दुकानदारांकडून 2,53,248 रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला इ. प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलिस स्टेशनचे पोसई शुभम चव्हाण करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शुभम चव्हाण, पोलिस हवालदार सागर बनसोडे, पोलिस हवालदार बंटी कवडे, पोलिस नाईक रईस मुलाणी, पोलिस शिपाई आशिष झगडे यांच्या पथकाने केली आहे. ( pune lonavala police raids illegal sellers of gutkha and panmasala in kamshet three arrested )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या निकृष्ट कामांबाबत आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात लक्षवेधी! पाहा व्हिडिओ
– आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर अवघ्या 3 मिनिटात पोहोचता येणार; काय आहे गुडन्यूज? लगेच वाचा
– रब्बी हंगाम पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन; जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती