व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन; जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती

पीकस्पर्धेमध्ये रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, व जवस अशा पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 15, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल
Crop-Competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी रब्बी हंगाम 2023 पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पीकस्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पीकस्पर्धेमध्ये रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, व जवस अशा पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान 40 आर क्षेत्र आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. ( Rabi Season Crop Competition Know Complete Information And Process Of Competition )

  • शेतकऱ्याचा विहित नमून्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क, 7/12, 8 अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक बुक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्वसामान्य गटासाठी प्रतिपिक 300 रुपये व आदिवासी गटासाठी प्रतिपिक 150 रूपये प्रवेश शुल्क राहील. तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

सर्वसाधारण व आदिवासी गटांकरीता तालुका पातळीकरीता पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार, तिसरे 2 हजार रुपये, जिल्हा पातळीकरीता पहिले 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार तर तिसरे बक्षीस 5 हजार रुपये आणि राज्य पातळीकरीता पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये असे बक्षीस असणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानुसार खंडाळा इथे मराठा समाजाकडून बेमुदत साखळी उपोषण; महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद
– अभिमानास्पद! परंदवडीच्या मा. सरपंच सुलभा भोते यांना ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सिलेंट सरपंच’ पुरस्कार
– ‘रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डीपीआर करा, वंदे भारतसह विविध एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा द्या’ – खासदार श्रीरंग बारणे


Previous Post

तळेगाव एमआयडीसीतील जेसीबी कंपनीत मोठी चोरी! लाखोंचे पार्ट लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Next Post

आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर अवघ्या 3 मिनिटात पोहोचता येणार; काय आहे गुडन्यूज? लगेच वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ekvira-Devi

आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर अवघ्या 3 मिनिटात पोहोचता येणार; काय आहे गुडन्यूज? लगेच वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.