आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहे. मावळ तालुक्यात सर्वच प्रमुख पक्षांतर्गत हालचाली वाढल्या असून संघटन बांधणी आणि पदाधिकारी नियुक्तीचा सपाटा सुरू आहे. मावळ तालुका काँग्रेसही संघटनेच्या मजबूतीसाठी काम करत असून त्याअनुषंगाने नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मावळ तालुका महिला काँग्रेसच्या नवीन तालुका अध्यक्ष पदासह अन्य काही नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुका महिला काँग्रेस आय पक्षाच्या अध्यक्षपदी पुष्पाताई निवृत्ती भोकसे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा किरणताई काळभोर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर, रामदास आप्पा काकडे, काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष यशवंतराव मोहोळ, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी ऍड. दिलीप ढमाले, ऍड. निखिल कवीश्वर, रोहिदास वाळुंज, खंडू तिकोने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुष्पा भोकसे या गेल्या दहा वर्षांपासून लोणावळा शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. ( Pushpa Bhokse appointed as President of Maval Taluka Mahila Congress I Party )
यासह मावळ तालुका महिला काँग्रेस आघाडीच्या विद्यमान अध्यक्षा प्रतिमा हिरे यांची पदोन्नती झाली असून पक्षाने त्यांना जिल्ह्यावर काम करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यांची आता पुणे जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड कऱण्यात आली आहे. पुष्पा निवृत्ती भोकसे या लोणावळा शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, परंतू त्यांच्यावर आता तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने लोणावळा शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी उषा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा शहराचे माजी नगराध्यक्ष अशोक चौधरी यांच्या पत्नी आणि शहर काँग्रेसच्या जुण्या जाणत्या नेत्या उषा चौधरी यांची आता लोणावळा शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मावळात काँग्रेस कात टाकतंय –
मावळ तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ हे मागील दोन वर्षापासून तालुक्यात काँग्रेसच्या संघटन वाढीसाठी काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला राज्यात चांगले यश मिळाले. या निवडणूकीपूर्वी मावळ तालुक्यातही काँग्रेस पक्षात चांगलेच इन्कमिंग झाले होते. यशवंतराव मोहोळ यांच्या नेतृत्वाच पक्षाने कात टाकून नव्याने उभारी घेतल्याचे दिसते. अशात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्ष जोराने कंबर कसताना दिसत असून आपली छाप आगामी निवडणूकीत पाडून दाखवेल, असे दिसते.
अधिक वाचा –
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 22 कोटींची विकासकामे…
– कार्ला – भाजे लेणी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, आयएनएस शिवाजी आदी ठिकाणी कैवल्यधाम योग संस्थेमार्फत योग प्रशिक्षण शिबिर
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनच्या माध्यमातून महागाव, सावंतवाडी, मालेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप