व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 30, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

योग्य उपचारानंतर भला मोठा अजगर डौलाने आपल्या नैसर्गिक अधिवासात परतला । Khopoli News

भला मोठा जखमी अजगर योग्य उपचारानंतर डौलाने आपल्या अधिवासात परतला

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 31, 2024
in मावळकट्टा
python

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : खोपोली शहरातील भानवज परिसरात सोमवारी (दि. 29 जुलै) सकाळी वनखात्याचे नितीन कराडे, शितल साळुंखे आणि संतोषी बस्तेवाड हे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना दाट झुडपाजवळ पक्षांचा किलबिलाट होत असताना दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तिथे त्यांना अजगर जातीचा साप आढळला. त्याच्या शरीरावर जखमा झाल्याने तो मरणासन्न अवस्थेत निपचित पडला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मात्र स्पष्ट आणि निरखून पाहिले असता त्याच्या शरीराची किंचितशी हालचाल होताना त्यांना दिसून आल्याने त्यांनी तातडीने ही बाब खालापूर तालुक्याचे वनअधिकारी राजेंद्र पवार आणि वनपाल भगवान दळवी यांना कळवली. त्यांच्या सल्ल्यानुसार त्या जखमी अजगराला सुरक्षितपणे सर्पमित्र नितेश उर्फ सोनू पवार यांच्या मदतीने खोपोलीतील वनखात्याच्या कार्यालयात आणले गेले. पशुवैद्य विष्णू काळे यांनी त्याची तपासणी केल्या नंतर त्याच्या जखमांवर औषध उपचार करून त्याला काही काळ देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार अजगराला सर्पमित्र दिनेश ओसवाल, अमोल ठकेकर, नवीन मोरे, अभिजीत घरत, सुकृत गोटस्कर, विजय भोसले यांच्या सहाय्याने गुरुनाथ साठेलकर यांच्या निवासस्थानी सुरक्षीत ठेवण्यात आले. अजगराची वेळेवर देखरेख करणे, त्याला औषधोपचार करणे, त्याचे शरीराची हालचाल करवून घेऊन मसाज करणे, त्याला ऊर्जा मिळावी म्हणून फोर्स फीडिंग अर्थात जबरदस्तीने खाणे भरवणे अशी सेवा करण्यात भक्ती साठेलकर, प्रवीण शेंद्रे व अन्य सर्पमित्रांनी वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतेही कसूर ठेवली नाही.

त्यामुळेच या सर्व घटनाक्रमाचा शेवट अत्यंत गोड झाला. तो जखमी अजगर तंदुरुस्त होऊन त्याच्या स्वभावधर्मा प्रमाणे आक्रमक झाला होता आणि मुक्त होण्यासाठी अधीर झालेला दिसला. तो संपूर्णतः बरा झाल्याची खात्री झाल्यावर त्याची पुनश्च एकदा वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले.

वाघ आणि सिंह या प्राण्यांच्या कॅटेगरीमध्ये अजगर जातीचा सरपटणारा जीव गणला जातो आणि तो जैविक साखळीतील अविभाज्य असा घटक असल्याची जाण ठेवून गंभीर जखमी अवस्थेत असलेला आणि शेवटची घटका मोजणाऱ्या अजगराला वाचवण्यासाठी वन अधिकारी, पशुवैद्य आणि सर्प मित्रांनी केलेल्या प्रयत्नांना सलाम करावा लागेल. ( python injured in Khopoli was cured after proper treatment )

अधिक वाचा –
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News


Previous Post

रस्ता खचला ! मुसळधार पावसामुळे पवन मावळातील कोळे-चाफेसर रस्त्याची दुरवस्था । Maval News

Next Post

‘त्या’ सारस पक्ष्याने घेतला शेवटचा श्वास, पक्षीमित्रांच्या डोळ्यात आसवे । Raigad News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Cranes dies

'त्या' सारस पक्ष्याने घेतला शेवटचा श्वास, पक्षीमित्रांच्या डोळ्यात आसवे । Raigad News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

June 30, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

June 30, 2025
Gopinath Munde Farmers Accident Safety Sanugraha Grant Scheme Documents Procedure Information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

June 30, 2025
Maval Taluka Marathi Journalists Association established Sudesh Girme elected as president see entire committee

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

June 30, 2025
10 foot python found in Boraj village Maval Wildlife conservationists release python into natural habitat

बोरज गावात आढळला 10 फुटी अजगर ; वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

June 30, 2025
ECI

भारत निवडणूक आयोगाकडून 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू – ‘ही’ आहेत कारणे

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.