व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘त्या’ सारस पक्ष्याने घेतला शेवटचा श्वास, पक्षीमित्रांच्या डोळ्यात आसवे । Raigad News

खालापूर तालुक्यातील हाळ गावातील रफिक कर्जीकर यांच्यासाठी 27 जुलै रोजी पक्षांच्या किलबिलाटातून उजाडलेली पहाट काहीशी स्पेशल होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 31, 2024
in महाराष्ट्र
Cranes dies

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : खालापूर तालुक्यातील हाळ गावातील रफिक कर्जीकर यांच्यासाठी 27 जुलै रोजी पक्षांच्या किलबिलाटातून उजाडलेली पहाट काहीशी स्पेशल होती. चिमण्या, कावळे, मैना आणि कबुतरांचा वावर या गावात होता. मात्र त्यांच्या घराच्या छपरावर एक वेगळाच पक्षी त्यांना दिसून आला. आता उडेल नंतर उडेल, असा कयास करणारे कर्जीकर कुटुंबीय तो उडत नाही हे पाहून बेचैन झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यांनी काळजी पोटी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनीफ कर्जीकर यांच्याशी संपर्क केला आणि या प्रकाराची माहिती दिली. तातडीने हनीफ यांनी गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधला आणि हा विषय त्यांच्या माध्यमातून प्राणी आणि पक्षी मित्रांना समजला. त्या पक्षाचा फोटो पाहून प्राणी पक्षी सर्पमित्र योगेश शिंदे आणि सुकृत गोटस्कर यांनी तो दुर्मिळ असा सारस पक्षी असल्याचे सांगितले. त्याला उडता येत नसेल तर सुखरूपपणे पकडून सुरक्षित जागी ठेवण्याची सूचना केली. ( Cranes dies during treatment Khopoli Raigad News )

त्यानुसार फरहान कर्जीकर याने त्या पक्षाला व्यवस्थितपणे पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवत त्याच्यासाठी दाण्यापाण्याची सोय केली. तो सारस पक्षी वरवर पाहता अशक्त दिसत असल्याचे समजताच पक्षी मित्र आणि या क्षेत्रातील अभ्यासक अभिजीत घरत यांनी खास प्राणी पक्षावर इलाज करणाऱ्या रेस्क्यू संस्था – पुणे यांच्याशी संपर्क साधला. त्या संस्थेचे सदस्य हर्षद हे विना विलंब या दुर्मिळ सारस पक्षाला उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता ॲम्बुलन्स घेऊन निघाले देखील.

सारस पक्षी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त तसा कोणास परिचित नव्हता, त्या कारणे त्याला बघण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. असा पक्षी आपण आपल्या आयुष्यात कधी पाहिला नसल्याचे बुजर्ग मंडळी सांगू लागली. त्याच दरम्यान रेस्क्यू टीमचे हर्षद आणि त्यांचे सहकारी हाळ गावात पोचले. त्यांनी सुरक्षितपणे त्या पक्ष्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पशुवैद्य विष्णू काळे यांच्यासह प्राथमिक इलाज सूरू केला मात्र त्या दरम्यान दुर्दैवाने त्या पक्षाचा मृत्यू झाला. रफिक कर्जीकर कुटुंबीयांनी हनिफ यांच्या साहाय्याने त्या पक्षाला नैसर्गिक अधिवास मिळावा म्हणून केलेली धडपड पाण्यात गेली होती. आपल्या घरात आलेला दुर्मिळ पाहुणा डोळ्यासमोर मृत्युमुखी पडलेला पाहून सर्वांचे डोळे पाणवले होते.

रेस्क्यू संस्थेच्या हर्षद यांनी कर्जीकर कुटुंबीयांचे कौतुक करताना सांगितले की, हल्ली आपल्या दैनंदिन व्यवहारात वेळ काढून सारस पक्षाला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न भलेही असफल झाले असतील, मात्र भविष्यात असे दुर्मिळ पक्षी किंवा प्राणी दिसता क्षणी त्या बद्दलची माहिती त्यांचे संस्थेस दिल्यास त्याला नैसर्गिक अधिवास मिळवून देण्यासाठी त्यांची संस्था तातडीने निशुल्कपणे सहकार्य करण्यास तयार आहे.

साधारणता चार ते पाच तास सारस पक्षाला वाचविण्यासाठी सुरू असलेले सर्वांचे प्रयत्न असफल झाले जरी असले तरी आजच्या घडीला मानवतेचे एक नवे उदाहरण म्हणून समोर आल्याचे प्राणी आणि पक्षी मित्र नवीन मोरे यांनी प्रतिपादन केले. हल्ली प्राणी आणि पक्षांचा अधिवास संकुचित होत गेल्याने ते आपल्या खाद्यासाठी मानवी वस्तीत येऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. सारस हा पक्षी सातत्याने नैसर्गिक बदलांनुसार पर्यटन करत असतो हाळ गावात आढळलेला पक्षी आजारी असल्याने त्याने विश्रांतीसाठी तेथे विसावा घेतल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असतील म्हणूनच तो सारस पक्षी आपल्या येथे आला आणि आमच्या हातून त्याची शेवटची का होईना त्याची सेवा घडली, हा योगायोग नव्हे तर अल्लाहचा आदेश असावा अश्या भावना रफिक कर्जीकर यांनी व्यक्त केल्या. याच गावातील गावकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी दुर्मीळ खवल्या मांजराला जीवदान दिले होते.

अधिक वाचा –
– मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

योग्य उपचारानंतर भला मोठा अजगर डौलाने आपल्या नैसर्गिक अधिवासात परतला । Khopoli News

Next Post

खोपोली नगर परिषदेच्या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ, 2500 वृक्षांची होणार लागवड । Khopoli News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
tree planting

खोपोली नगर परिषदेच्या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ, 2500 वृक्षांची होणार लागवड । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.