ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ( Queen Elizabeth II ) यांचे 8 सप्टेंबर रोजी वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जातोय. राणी एलिझाबेथ ( Queen Elizabeth ) या दुसऱ्या महायुद्धापासून ते 21व्या शतकाचे वारे जगात वाहायला लागेपर्यंतच्या इतिहासाच्या एकमेव साक्षीदार होत्या. त्यांच्या निधनानंतर एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून व्यक्त होतायेत. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष ( MNS President ) राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी देखील एक पोस्ट शेअर करत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी…
“ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाल. 70 वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या आणि ही 70 वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची 70 वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ 2 यांच्यामुळे”
“ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणूनसुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं”
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
#QueenElizabethII pic.twitter.com/RrZoCsTK3P
— Raj Thackeray (@RajThackeray) September 9, 2022
“कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ द्वितीय यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? की राजघराण्याचा सूर्य मावळतोय? हे बघणं कुतूहलाच असेल. एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्या स्मृतीस अभिवादन”, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. ( Queen Elizabeth II Passes Away MNS President Raj Thackeray Condolence Post )
अधिक वाचा –
तब्बल 70 वर्षे ब्रिटनच्या महाराणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन; जगभरातून श्रद्धांजली
मावळमध्ये मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? ‘या’ भेटीने चर्चेला उधाण