Dainik Maval News : मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावात भव्य अशा मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यातील पैलवान खेळाडूंना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करता यावे आणि त्यांच्या कलागुणांचा उचित सन्मान व्हावा, यासाठी प्रशांतदादा भागवत युवा मंच च्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत पुरुष गटात पै. राहुल सत्यवान सातकर (कान्हे) याने दमदार कामगिरी करत मावळ केसरी किताबावर आपले नाव कोरले. महिलांच्या गटात पै. अनुष्का शाहिदास दहिभाते (बेडसे) हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत महिला मावळ केसरीचा मान पटकावला. तर, कुमार गटात पै. ओंकार शामराव भोते (परंदवडी) याने बाजी मारत कुमार केसरीचा किताब जिंकला.
विजेत्या खेळाडूंना आयोजकांकडून बक्षीस म्हणून दुचाकी, मानचिन्ह व रोख रक्कम देण्यात आली. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या सौजन्याने झालेल्या या स्पर्धेत १२५ कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता. अत्यंत भव्य, दिमाखदार स्परुपात आणि शिस्तबद्ध वातावरणात ही स्पर्धा पार पडली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला

