व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Raigad Landslide । मोठी दुर्घटना! रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली, 35 ते 40 घरे मलब्याखाली

प्राप्त माहितीनुसार, ईरशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही वस्ती वजा गाव एकूण 35 ते 40 घरांचे गाव आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 20, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
raigad-landslide

Photo - Team Dainik Maval


रायगड ( Raigad ) जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत – खालापूर मतदारसंघात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी ( Irshalwadi ) गावावर रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळली ( Landslide ) आणि या दुर्घटनेत संपूर्ण गाव मलब्याखाली दबले गेले आहे. रात्री घटलेल्या या घटनेत जागे असणारे चार पाच तरुण यांचा जीव वाचला असून त्यांनी या घटनेची माहिती पायथ्याशी असणाऱ्यांना दिली. त्यानंतर रात्रीपासूनच घटनास्थळी बचाव दल, पोलिस, मंत्री आदी यंत्रणा दाखल होत मदत कार्य सुरु आहे. ( raigad karjat khalapur irshalgad irshalwadi landslide )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, ईरशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही वस्ती वजा गाव एकूण 35 ते 40 घरांचे गाव आहे. या गावावर रात्रीच्या सुमारास दरड कोसळली ज्यात चार पाच घरे वगळता बाकी सर्व घरांवर दरड कोसळून ती मलब्याखाली दबली गेली आहेत. साधारण 100 हून अधिक जण या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवली जात असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत वाचवल्यापैकी 4 जण दगावले असून त्यात एका अग्नीशमन दलाच्या जवानाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, एनडीआरएफ टीम, अग्नीशमन दल आदींकडून बचाव कार्य वेगाने सुरु आहे. यासह रात्रीच स्पॉटवर गेलेले मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत यांच्या नंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील घटनास्थळी जाणार आहेत. जोराचा पाऊस आणि धुके यामुळे बचावकार्य करण्यात अडथळा येत आहे. तसेच घटनास्थळ उंचावर असल्याने येथे कोणतेही वाहन वगरे जात नसल्याने थेट मनुष्यबळासह बचावकार्य करणे हा एकमेव पर्याय या ठिकाणी आहे.

अधिक वाचा –
– भाजपाने भाकरी फिरवली, पक्षाकडून नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त, पुणे – मावळ भागाची जबाबदारी ‘या’ नेत्यावर
– शिवदुर्ग मित्रला राज्यातील पहिला ‘माऊंटन सर्च आणि रेस्क्यू टीम ऑफ दी इयर’ पुरस्कार प्रदान


dainik maval jahirat

Previous Post

किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरण : पीडित महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे – डॉ. नीलम गोऱ्हे

Next Post

मोठी बातमी! लोणावळा शहरात हंगामातील विक्रमी पाऊस, 24 तासात तब्बल 273 मी.मी. पावसाची नोंद । Lonavala Rain Update

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavala-Rain-Update

मोठी बातमी! लोणावळा शहरात हंगामातील विक्रमी पाऊस, 24 तासात तब्बल 273 मी.मी. पावसाची नोंद । Lonavala Rain Update

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.