विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज (शुक्रवार, दि. 12) अखेर लोणावळ्यात नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले आहे. पूर्वसुचना आणि पूर्वनियोजनानुसार आज शेकडो नागरिक आज सकाळीच रेल रोकोसाठी आंदोलनात सामील झाले आणि बघता बघता आंदोलकांनी तब्बल 20 मिनिटे डेक्कन क्विन एक्सप्रेस रोखून धरली. या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी होता. परंतू आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बराचवेळ रेल्वे वाहतूक खोळंबली आणि काहीकाळासाठी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे ते लोणावळा लोकल फेऱ्या पूर्ववत कराव्यात. स. 11 ते दु. 3 या वेळेत लोकल सेवा सुरु करावी, तसेच एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळ्यात करावा अशा अनेकविध मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सकाळीच जयचंद चौकात आक्रमक होत पुण्याकडून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस तब्बल 20 मिनिटे रोखून धरली हाेती. रेल्वे पोलिसांकडून स्थानिकांना रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र तरीही स्थानिक रेल्वे रुळावर उतरले आणि त्यांनी डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. ( rail roko movement at lonavala hundreds of citizens on railway track deccan queen train stopped for 20 minutes )
रेल्वे प्रवाशांच्या नेमक्या मागण्या काय?
1. पुणे ते लोणावळा दुपारच्या वेळेत लोकल सेवा सुरु करण्यात यावी.
2. वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसला लोणावळ्यात थांबा मिळाला पाहिजे.
3. इतर अनेक एक्स्प्रेस गाड्यांना देखील लोणावळा रेल्वे स्थानकात थांबा मिळावा.
आंदोलकांनी डेक्कन क्विन एक्स्परेस गाडी 20 मिनिटे रोखून धरली होती. शेकडो नागरिक यावेळी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. तर अनेकजण रेल्वे रुळावर उतरले होते. अखेर रेल्वे पोलिसांच्या विनंतीला मान देत आंदोलनकर्ते रेल्वे रूळावरून बाजूला झाले. यावेळी स्टेशन मास्तर रजपूत यांनी रेल्वे प्रशासनाच्या वतीने निवेदन स्विकारत रेल्वे प्रशासनाकडून आलेल्या सूचनेनुसार दुपारच्या वेळेतील बंद असलेल्या लोकल सुरू करण्याचे तसेच पाच एक्सप्रेस गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकात थांबा देण्याचे आश्वासन दिले.
अधिक वाचा –
– करुंज-बेडसे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण
– मोठा निर्णय! पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत आता भूमिहिनांना मिळणार 1 लाखांचे अनुदान
– मोठी बातमी! श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा शिंदे सरकारचा निर्णय