ब्रिटिश काळात क्रांतीची मशाल ज्यांनी पेटवली ते आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची दिनांक 7 सप्टेंबर रोजी जयंती असते. उमाजी नाईक यांची जयंती शासकीय स्तरावर मावळ तालुक्यातील सर्व गावांत ग्रामपंचायतींमध्ये आणि शाळांमध्ये साजरी व्हावी, याकरिता मावळ तालुका रामोशी संघटना यांच्यावतीने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना निवेदन देण्यात आले.
उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 ला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला. दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी भिवडी इथे मोठ्या जल्लोषात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी होते, परंतू मावळ तालुक्यात शासकीय स्तरावर काहीच कार्यालयांमध्येच ही जयंती साजरी होती. असे न होता तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये आणि शाळांमध्ये उमाजी नाईक यांची जयंती साजरी व्हावी, याकरिता तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच ज्या कार्यालयात जयंती साजरी होणार नाही, तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील या पत्रातून करण्यात आली. ( Raje Umaji Naik Birth Anniversary should be celebrated in all the villages of maval taluka )
हे निवेदन पत्र देताना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका संघटनेचे अध्यक्ष भाऊ साहेब चव्हाण, उपअध्यक्ष सुमित चुकाटे, सचिव शाम लांडगे, सचिन चव्हाण, कानिफनाथ चव्हाण, सचिन भंडलकर, गोरख चव्हाण, खंडू चव्हाण, संतोष चव्हाण, कार्ले रवी माकर आदी जण उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाराष्ट्र सरकारच्या कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना : जाणून घ्या योजनेची माहिती आणि संपूर्ण प्रक्रिया
– पवना धरण फुल्ल, तरीही पिंपरी-चिंचवड शहराला होतोय दिवसाआड पाणीपुरवठा, ‘हे’ आहे कारण
– कामशेत शहर महिला आघाडी अध्यक्षपदी ‘यांची’ निवड, इंदोरी इथे कलश पूजन आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम