Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या शिक्षण चळवळीत खास करून ग्रामीण भागात विद्यादानाचे कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये ज्या संस्थेचे नाव आदराने घेतले जाते, अशा आढले बुद्रुक येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेच्या भव्य नूतन इमारतीचे बुधवारी ( दि. २४ ) उद्घाटन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी या सीबीएसई ( CBSE School ) स्कूलच्या नूतन इमारतीचा भव्य उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात येणार आहे. गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल आणि स्पोर्ट अकॅडमीचे चेअरमन सचिन आनंदराव घोटकुले आणि व्हाईस चेअरमन अनिता सचिन घोटकुले यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.
मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक येथे असणाऱ्या गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल आणि स्पोर्ट अकॅडमी विद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या शुभहस्ते, भव्य इमारतीचे उद्घाट होईल. याप्रसंगी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. मावळ तालुक्यातील नागरिक, पालक, विद्यार्थी यांनी याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिन घोटकुले आणि अनिता घोटकुले यांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश

