Dainik Maval News : जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी 25 जुलै रोजी एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्या मतदारसंघात चोऱ्या होत असून, त्या चोऱ्या फासेपारधी आणि रामोशी करीत असल्याचे विधान केले होते, याशिवाय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या विषयी देखील अपमानजनक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
मावळ तालुक्यातील ‘आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका’ या संघटनेकडून आमदार शरद सोनावणे यांच्या या विधानाचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये आमदार शरद सोनावणे यांच्या विरोधात पत्र देऊन सोनावणे यांनी रामोशी समाजाची माफी मागावी अन्यथा समाज रस्त्यावर उतरेल, असे निवेदन दिले आहे.
उपाध्यक्ष बाळासाहेब गुडगुल, सचिव शाम लांडगे, सहकार्य अध्यक्ष सचिन चव्हाण, संपर्क प्रमुख कानिफनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष गिरीश चव्हाण, सहकार्य अध्यक्ष शेखर खोमणे, रवी माकर असे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकारी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक यांना निवेदन पत्र दिले असून त्यात, आमदार शरद सोनावणे यांनी रामोशी समाजाची हात जोडून माफी मागावी अन्यथा मावळ तालुक्यात रामोशी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. २५ जुलै २०२५) आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्याबद्दल अश्लाघ्य शब्द वापरले. तसेच, आपल्या मतदारसंघात चोऱ्या होत असून, त्या चोऱ्या फासेपारधी आणि रामोशी करीत असल्याचे विधान केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळा शहरात एका युवतीवर कारमध्ये विविध ठिकाणी सामुहिक बला’त्कार, एक आरोपी अटकेत । Lonavala Crime
– मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणीनंतर ठरल्या ‘नावडत्या’
– लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख 81 हजारांची फसवूणक; मावळमधील घटना, गुन्हा दाखल । Maval Crime