पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. अशात आज शुक्रवार (दिनांक 8 सप्टेंबर) रोजी पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता एकुण 3500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीच्या जलपातळीत वाढ होणार असून नागरिकांनी सावध रहावे, अशी सुचना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
“पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की पवना धरण 100 टक्के क्षमतेने भरलेले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदीमध्ये सकाळी 6 वाजता 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता आणि आवकानुसार सकाळी 8 वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून 2100 क्यूसेक्स असे एकुण 3500 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती.” असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
तहसील कार्यालय मावळ दिनांक 08 सप्टेंबर 2023 रोजी पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे;
वडगाव – 25.0 मि.मि
तळेगाव – 21.00 मि.मि
लोणावळा – 110.00 मि.मि
शिवणे – 60.00 मि.मि
खडकाळा – 62.00 मि.मि
काले – 73.00 मि.मि
कार्ला – 98.00 मि.मि
एकुण पाऊस – 449.00 मि.मि
टीप – दिनांक 07 सप्टेंबर 2023 रोजी मावळ तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे जिवितहानी अहवाल निरंक आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘गोविंदा रे गोपाळा…’ मावळ तालुक्यात शाळांमध्ये दहीहंडीचा उत्साह
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना सुखद धक्का
– सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज ते सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय