पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात तिसऱ्या परिमंडळाला शासनाने मान्यता दिली होती. त्यानंतर आता आठ महिन्यांनी या परिमंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची सुरुवात 15 ऑगस्ट 2018 रोजी झाली होती. आयुक्तालयाच्या सुरुवातीला दोन परिमंडळांची रचना करण्यात आली. सुरुवातीला शहर पोलिसांच्या हद्दीत 14 पोलीस ठाण्यांचा समावेश होता. त्यानंतर चिखली, शिरगाव, महाळुंगे एमआयडीसी, रावेत हे चार पोलीस स्टेशन नव्याने सुरू करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वाढते नागरिकरण, औद्योगीकरण, शहरीकरण, शैक्षणिक संस्था, वाहनांची संख्या लक्षात घेता आणखी एका परिमंडळाची गरज निर्माण झाली, त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत तिसरे परिमंडळ मंजूर करून घेतले. ( Reorganization of circles in Pimpri Chinchwad Police Commissionerate creation of third circle )
सप्टेंबर 2023 मध्ये तिसऱ्या परिमंडळाला शासनाने मान्यता दिली. परिमंडळ तीनचे पहिले पोलीस उपायुक्त म्हणून संदीप डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. आठ महिन्यानंतर तीनही परिमंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. रावेत पोलीस ठाणे परिमंडळ दोनच्या वाकड विभागात होते. नव्या रचनेनुसार रावेत पोलीस ठाणे परिमंडळ एकच्या चिंचवड विभागात आणले आहे.
परिमंडळांची सुधारित रचना :
परिमंडळ एक
पिंपरी विभाग – पिंपरी पोलीस ठाणे, भोसरी पोलीस ठाणे, सांगवी पोलीस ठाणे
चिंचवड विभाग – चिंचवड पोलीस ठाणे, निगडी पोलीस ठाणे, रावेत पोलीस ठाणे
परिमंडळ दोन
देहूरोड विभाग – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, देहूरोड पोलीस ठाणे, शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे
वाकड विभाग – वाकड पोलीस ठाणे, हिंजवडी पोलीस ठाणे
परिमंडळ तीन
चाकण विभाग – चाकण पोलीस ठाणे, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे, आळंदी पोलीस ठाणे
भोसरी विभाग – दिघी पोलीस ठाणे, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे, चिखली पोलीस ठाणे
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागण्याआधीच आमदार सुनिल शेळकेंनी मावळ तालुक्यासाठी खेचून आणला भरघोस निधी । MLA Sunil Shelke
– लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं, देशात सात टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी अंतिम मतमोजणी, वाचा A टू Z माहिती
– मावळ भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान, गावोगावी जाऊन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद । Maval BJP