व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 19, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना, 5 नव्या मंडळांची निर्मिती; तुमचे गाव कोणत्या मंडळात? पाहा संपूर्ण यादी । Maval News

मावळ तालुक्‍यातील महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात आता आधी असलेल्या 7 महसूल मंडळांमध्ये 5 नवीन महसूल मंडळांची भर पडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 12, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
revenue-mandals-maval-taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्‍यातील महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात आता आधी असलेल्या 7 महसूल मंडळांमध्ये वडेश्र्वर, परंदवडी, टाकवे बुद्रुक, टाकवे खुर्द व कुसगाव बुद्रुक अशा 5 नवीन महसूल मंडळांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील महसूल मंडळांची संख्या दुपटीने वाढून ती 12 महसूल मंडळे इतकी झाली असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्‍यात याआधी वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, खडकाळा, काले, शिवणे, कार्ला व लोणावळा अशी 7 महसूल मंडळ कार्यरत होती. या 7 मंडळांच्याअंतर्गत 71 सजांचा कारभार चालत होता. दरम्यान दिनांक 15 फेब्रुवारी 2018 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी काढलेल्या अंतिम अधिसूचनेनुसार तब्बल 6 वर्षांनी महसूल मंडळांच्या पुनर्रचनेची ही कार्यवाही झाली आहे. ( reorganization of revenue mandals in maval taluka 5 new mandal were created )

  • तालुक्यातील मंडल अधिकारी कार्यालयांचे विभाजन होऊन विस्तारीकरण झाल्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांवर असणारा कामाचा ताण कमी होणार आहे. तसेच, तालुक्यातील नागरिकांना मंडल अधिकारी कार्यालय आपल्याजवळ आल्याने त्यांची गैरसोय दूर होऊन वेळ, पैसा यांची बचत होणार आहे. संबंधित नवीन महसूल मंडळांसाठी मंडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे, असेही तहसीलदारांनी सांगितले.

तालुक्यातील एकूण मंडल विभाग आणि त्यात समाविष्ट सजा खालीलप्रमाणे;

  1. वडगाव मावळ – वडगाव, कातवी, नवलाख उंबरे, बधलवाडी, आंबळे, निगडे
  2. तळेगाव दाभाडे – तळेगाव, वराळे, आंबी, इंदोरी, सोमाटणे
  3. खडकाळा – खडकाळा, कुसगाव खुर्द, कान्हे, नायगाव, जांभूळ, साते
  4. कार्ला – कार्ला, वेहेरगाव, मळवली, औंढे खुर्द, ताजे
  5. काले – काले, मोरवे, चावसर, दुधीवरे, शिळींब, जोवण, कोथूर्णे, करुंज
  6. लोणावळा – लोणावळा, खंडाळा, कुणे नामा, उढेवाडी, कुरवंडे, भुशी
  7. शिवणे – शिवणे, चांदखेड, दिवड, बौर, शिवली, करूंज, आढले बुद्रुक
  8. वडेश्र्वर (नवीन) – वडेश्‍वर, नागाथली, कशाळ, खांड, किवळे, इंगळून, माळेगाव बुद्रुक
  9. टाकवे बुद्रुक (नवीन) – टाकवे बुद्रुक, माऊ, करंजगाव, घोणशेत, नाणे, कांब्रे नामा
  10. टाकवे खुर्द (नवीन) – टाकवे खुर्द, थोराण, खांडशी, पाथरगाव
  11. परंदवडी (नवीन) – परंदवडी, दारूंब्रे, उर्से, गहुंजे
  12. कुसगाव बुद्रुक (नवीन) – कुसगाव बुद्रुक, नांगरगाव, डोंगरगाव, वरसोली, वलवण, तुंगार्ली, वाकसई

अधिक वाचा –
– पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर विशेष बैठक संपन्न । Maval News
– करुंज-बेडसे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण
– मोठा निर्णय! पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत आता भूमिहिनांना मिळणार 1 लाखांचे अनुदान

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद! विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन, डेक्कन क्विन रोखल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ । Lonavala Railway Movement

Next Post

युवा दिन विशेष : ‘गरजू लेकरांना तिनं दिलाय मदतीचा खंबीर हात’ । Help Welfare Trust Deepali Warule

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Deepali-Warule-Pune

युवा दिन विशेष : 'गरजू लेकरांना तिनं दिलाय मदतीचा खंबीर हात' । Help Welfare Trust Deepali Warule

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Veteran writer Padmashri Aranyarishi Maruti Chitampalli Passes Away

अरण्यऋषी हरपला… ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन । Maruti Chitampalli Passes Away

June 18, 2025
Sant Tukaram Maharaj Palkhi departs from Dehu towards Pandharpur

PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात

June 18, 2025
Accident

अत्यंत दुःखद ! देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

June 18, 2025
Ajit-Pawar

तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar

June 18, 2025
No further action will be taken against bicycle carriers installed at back of vehicles

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर यापुढे कारवाई नाही ; परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

June 18, 2025
Cabinet meeting decision Chief Minister Devendra Fadnavis

फडणवीस सरकारचा निर्णय ! आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ, हयात जोडीदारालाही मिळणार मानधन

June 18, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.