तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अशोक दादाभाऊ दाभाडे यांनी तब्येत ठिक नसल्याचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील यांच्याकडे सोपविला आहे. आपली तब्येत ठिक नसून पक्ष संघटनेसाठी वेळ देता येणार नसल्याने आपला राजीनामा स्विकारावा आणि त्वरित दुसऱ्या शहर अध्यक्षाची नेमणूक करावी अशी विनंती त्यांनी राजीनाम्यात केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा 2023 मध्ये घेतली होती. मध्यंतरी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तळेगाव शहरांमधून महायुतीचा उमेदवाराला चांगल्या प्रकारे मताधिक्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मिळवून दिलं होतं. दाभाडे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये कार सेवकांचा सन्मान, अयोध्येमध्ये श्रीरामाच्या दर्शनासाठी तळेगाव शहरातील पक्षाच्या सर्व मोर्चा आघाड्याच्या नियुक्त करणे, तळेगाव मध्ये मतदार वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच तळेगावातील अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडणे आदी उपक्रम सर्व सहकाऱ्यांच्या समावेत पक्ष वाढीसाठी यशस्वीरित्या पार पाडले. ( Resignation of BJP Talegaon Dabhade City President Ashok Dabhade )
या सर्व गोष्टी होत असताना त्यांनी आपल्या तब्येतीच्या कारणामुळे स्वखुशीने जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे. दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
अधिक वाचा –
– मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस, मुख्यमंत्र्यांकडून एक मागणी मान्य
– मावळात तिहेरी हत्याकांड ! गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू, मृत महिलेसह दोन जिवंत मुलांना नदीत ढकलले
– कामशेतमध्ये जबरी चोरी, बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांकडून सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास । Kamshet News