पवनानगर (प्रतिनिधी) – काले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये सध्या अनागोंदी सुरू असल्याचे दिसत आहे. यालाच कंटाळून अखेर सोसायटीच्या चार संचालकांनी राजीनामे दिले आहेत. तसेच यासंदर्भात जिल्हा सहकारी निबंधक कार्यालयात तक्रार अर्ज देखील देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहे अर्ज?
सदर तक्रार अर्जात, “सोसायटीचे सचिव हे कोणत्याही संचालकांना विश्वासात घेत नसून त्यांनी कोणतीही सभा न घेता बोगस सभा दाखवून रिक्त जागेचा प्रस्ताव परस्पर पाठविण्यात आला आहे. तसेच मागील दोन वर्षात एकही सभा घेतलेली नाही. यासंदर्भात वडगाव मावळ निबंधक कार्यालयात तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र तेथील अधिकारी कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. तरी आपण सदर तक्रारीची दखल घेऊन बोगस सभा दाखवून रिक्त जागेचा पाठवलेला ठराव रद्द करून त्यास स्थगिती देण्यात यावी” अशी मागणी सोसायटीचे संचालक नंदू कालेकर,विकास कालेकर, ज्ञानेश्वर आढाव, दत्तात्रय कालेकर यांनी केली आहे. ( Resignation of four directors of kale co-operative societies Pavananagar )
अधिक वाचा –
– ‘टेंट व्यवसाय अधिकृत करण्यासाठी प्रयत्न सुरु’, बाळा भेगडेंनी घेतली पवना टेंट व्यावसायिकांची भेट
– भाजे गावातील ‘त्या’ चोरीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 2 तासात लावला छडा, आरोपी अटकेत
– मावळात ‘अवकाळीने’ अनेकांचे नुकसान, सरसकट सर्वांच्याच नुकसानीचे पंचनामे करा; खासदार बारणेंचे तहसीलदारांना पत्र