कर्नाटकातील मराठी भाषिक असलेल्या 865 गावातील इंच इंच जागा महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मांडण्यात आलेला सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. सीमाप्रश्नाबाबत विधिमंडळात आज (मंगळवार) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनच्या नवव्या दिवशी ठराव मांडणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार आज ठराव मांडण्यात आल्यानंतर तो एकमताने मंजूर झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
LIVE : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत विधानसभेत ठराव मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://t.co/nkNWUkMreG
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 27, 2022
कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपुर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल. 865 गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे, असे ठरावात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला. ( Resolution Against Karnataka Border Dispute Was Passed Unanimously In Maharashtra legislature Winter Session 2022 Nagpur )
अधिक वाचा –
– अटलजींच्या जयंतीनिमित्त आदिवासी मुलांना कपडे आणि खाऊचे वाटप; प्रमोद शेलार यांच्या पुढाकारातून स्तुत्य उपक्रम
– ‘हॅण्ड इन हॅण्ड’ आणि ‘फिंचम इंडिया’ मार्फत महागावमध्ये शासकीय सामजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम