महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे अंतर्गत मावळ तालुक्यात यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिके प्रकल्प संचालक आत्मा पुणे संजय काचोळे व प्रकल्प उपसंचालक आत्मा पुणे श्रीधर काळे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत मौजे वडेश्वर येथे प्रगतीशील शेतकरी तुकाराम लष्करी यांच्या शेतावर यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिकांचा शुभारंभ दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका कृषि अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी मंडळ कृषि राजाभाऊ गायकवाड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, कृषि पर्यवेक्षक नवीनचंद्र बोऱ्हाडे , कृषि सहाय्यक घनशाम दरेकर, सुनिल वाव्हळकर, प्रगतीशील शेतकरी नामदेव खांडभोर, सुरेश वाघमारे, श्रीकांत लष्करी तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी पडवळ यांनी सांगितले की, मावळ तालुक्यातील प्रमुख पीक हे भात आहे. भात शेतीसाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता जाणवत आहे व योग्य पाऊस झाला की प्रत्येक शेतकऱ्यांची भात लागवाढीची लगबग सुरु होते. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकी भात लागवडीचा अवलंब मोठ्या प्रमाणात करावा. ( Rice cultivation started in Maval taluka by machine )
- यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे लागवड खर्चात बचत होते व योग्य वयातील रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करावा. यंत्रामुळे शेतकर्यांची वेळ, बियाणे, मजुरी इत्यादीत मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे पडवळ यांनी संगितले.
यंत्राद्वारे भात लागवड केल्यामुळे होणारे फायदे पाहिल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात यांत्रिकी भात शेतीकडे वळत आहेत. त्यांना कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), मावळ यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असल्याबाबत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे यांनी माहिती दिली. यावेळी वडेश्वर, नागाथली, माऊ इत्यादी गावांमध्ये यंत्राद्वारे भात लागवडीसाठी तयार केलेल्या रोपवाटिकेला भेट देवून मार्गदर्शन करण्यात आले.
अधिक वाचा –
– ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्रता निकष जाहीर, वाचा कोण होणार लाभार्थी आणि आवश्यक कागदपत्रे
– तळेगाव दाभाडे येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा ; पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन
– उंदीर पकडायच्या जाळीत अडकले नागोबा, सर्पमित्रांंकडून जीवदान