Dainik Maval News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबीर कामशेत येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय तथा अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मित्र पक्षाकडून कायमच रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरले जाते आणि सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात दिला जात नाही. अशा परिस्थितीत आपली स्वबळावर लढण्याची तयारी असायला हवी. फक्त बौद्ध समाजाच नाही तर सर्व समाजातील लोकांशी सलोख्याचे संबंध असायला हवे. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करणे ही कायमच आपल्या पक्षाची भूमिका आहे. तसेच पक्ष बांधणीत आपली योग्य भूमिका बजावली पाहिजे.
- महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून बहुसंख्य कार्यकर्ते या अभ्यास शिबिराच्या निमित्ताने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शना साठी उद्योग व्यवसाय, समाजकारण याचबरोबर पक्ष बांधणीत आपली भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग आणि व्यवसाय चे मार्गदर्शन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (DICCI) चे पाश्चिम भारत अध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले तर पक्ष बांधणी बाबत मार्गदर्शन विजय खरे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजाभाऊ सरवते हे होते यावेळी राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर , आण्णा वायदंडे ( अध्यक्ष मातंग आघाडी), पप्पू कागदे ( युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य), परशुराम वाडेकर ( संघटक सचिव, महाराष्ट्र प्रदेश), श्रीकांत कदम ( अध्यक्ष पुणे जिल्हा), शरण कुमार लिंबाळे ( ज्येष्ठ साहित्यिक), अँड, दिलीप काकडे ( ज्येष्ठ विचारवंत), मंदार भारदे ( उद्योजक), अरुण खोरे (पत्रकार), गणेश गायकवाड,समीर जाधव (युवक अध्यक्ष पुणे जिल्हा),मालन बनसोडे अशोक सरवते विक्रम शेलार,अंकुश सोनवणे, रूपेश गायकवाड सिद्धार्थ चौरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी तर आभार पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकबापू गायकवाड व मावळ तालुका अध्यक्ष आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates