इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या सन २०२३-२४ या वर्षाकरिता संध्या थोरात यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. इनर व्हील क्लब इंटरनॅशनलचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. सोमाटणे इथे हा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. दीप प्रज्ज्वलनाने आणि श्रेयस थोरात यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी आणि इतर उपस्थितांचे स्वागत केले. रचना मालपाणी यांच्या उपस्थितीत आणि माजी अध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्याकडून संध्या थोरात यांनी पदभार स्वीकारला.
माजी प्रेसिडेंट वैशाली दाभाडे यांनी त्यांच्या भाषणात वर्षभर केलेल्या विविध उल्लेखनीय प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यांच्या कार्याची डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी यांनी विशेष दखल घेऊन त्यांच्या या कार्याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. शताब्दी वर्षात किमान १०० प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्षा संध्या थोरात यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. ( Sandhya Thorat appointed as President of Inner Wheel Club of Talegaon Dabhade )
क्लबचे सर्व माजी अध्यक्ष, पदाधिकारी व मेंबर्स यांना सोबत घेऊन समाजोपयोगी कामे करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी यांनी प्रकल्प राबवताना संख्यात्मकतेवर भर देताना गुणवत्तेवर भर द्यावा, जेणेकरून इनर व्हील ह्या संस्थेचे नाव व कार्य सर्वदूर पसरेल असा मोलाचा सल्ला दिला. पूर्ण वर्षभरात दरमहा कोणते प्रकल्प संपन्न करावयाचे या बाबत मार्गदर्शन केले आणि प्रेसिडेंट संध्या थोरात यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रेसिडेंट संध्या थोरात यांच्या पदग्रहण समारंभाच्या वेळी पुढील प्रमाणे प्रकल्प राबविले गेले
१. सोमाटणे फाटा आणि चौराईनगर परिसरात ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी तीन ठिकाणी सार्वजनिक कचराकुंड्याचे लोकार्पण करण्यात आले. प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी हा प्रकल्प राबविला
२. शिक्षण, कला, क्रीडा, पत्रकारिता, नागरी संरक्षण व समाजसेवा या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मान्यवरांचा रचना मालपाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींमध्ये; समाजसेवा – नयना डोळस, कलाक्षेत्र – डॉ. विनया केसकर, पत्रकारिता – चैत्राली राजापूरकर, पोलीस उपनिरीक्षक – श्रुती संजय मालपोटे, SSC बोर्ड मावळ तालुका प्रथम क्रमांक – डॉ. अण्णासाहेब चौबे हायस्कूल तळेगांव कु. यश नायबराव गडकर, SSC बोर्ड मावळ तालुका प्रथम क्रमांक – प्रग्यानबोधिनी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरगाव कु. श्रुती किरण सावंत, कुस्तीपटू मावळ केसरी – सावरी सत्यवान सातकर या माननियांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पासाठी क्लबच्या माजी सेक्रेटरी सौ मुग्धा जोर्वेकर यांनी योगदान देऊन सहकार्य केले.
३. क्लबच्या माजी अध्यक्षा मीरा बेडेकर यांनी कु. क्षितिजा खिलारे या विद्यार्थिनीला दत्तक घेतले आहे. या विद्यार्थिनीसाठी शैक्षणिक मदत रचना मालपाणी यांच्या हस्ते संबंधितांकडे सुपूर्द केली गेली.
४. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना अगदी एका दिवसात उत्तम स्थितीतील २०० साड्या डिमार्क या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आल्या. हा प्रकल्प माजी अध्यक्षा भारती शहा यांनी पूर्णत्वाला नेला.
तसेच यावेळी क्लबच्या नवीन मेंबर्सचा शपथग्रहण सोहळा आणि एडिटर आरती भोसले यांनी तयार केलेल्या प्रेरणा बुलेटिनचे प्रकाशन मा. रचनाजी मालपाणी यांच्या हस्ते झाले. व्हाइस प्रेसिडेंट अर्चना देशमुख यांनी आपल्या खुमासदार शैलीत सर्वांचे आभार मानले. डॉ. दीपाली झंवर यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ( Sandhya Thorat appointed as President of Inner Wheel Club of Talegaon Dabhade )
तळेगांव दाभाडे इनरव्हील क्लबच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे;
प्रेसिडेंट – संध्या थोरात, व्हाइस प्रेसिडेंट – अर्चना देशमुख, IPP – वैशाली दाभाडे, सेक्रेटरी – निशा पवार, जॉईंट सेक्रेटरी – रश्मी थोरात, ट्रेझरर – भाग्यश्री काळेबाग, आयएसओ – वैभवी पवार, एडिटर – आरती भोसले. CC – संगीता शेडे क्लबचे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स – काजोल गारोळे, दीपाली चव्हाण, जयश्री दाभाडे, उज्ज्वला बागवे, सोनाली शुक्ल आणि मंगल पवार.
अधिक वाचा –
– पाटण गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; 160 महिलांची कार्यशाळेला उपस्थिती
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात बैठक संपन्न, आयुक्त सौरभ राव यांनी दिले महत्वाचे निर्देश
– …अन् दारुंब्रे शाळेच्या भिंती लागल्या बोलू, आमदार सुनिल शेळकेंकडून तोंडभरुन कौतूक