मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजोग वाघेरे पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी आज (दि. 19) त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला. ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने मावळ लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना AB फॉर्म सुपूर्द करण्यात आला,’ असे ट्विट सचिन अहिर यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संजोग वाघेरे 23 एप्रिल रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज –
संजोग वाघेरे पाटील यांची बुधवारी (दि. 17 एप्रिल) पत्रकार परिषद झाली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण 23 एप्रिल अर्थात हनुमान जयंतीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले होते. ( Sanjog Vaghere Patil will file his nomination form on April 23 in Maval Lok Sabha Constituency )
‘येत्या मंगळवारी (दि. 23) मावळ लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यावेळी युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर आणि महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने, मावळ लोकसभा उमेदवार श्री. संजोग वाघेरे पाटील जी यांना माझ्या उपसथितीमध्ये AB फॉर्म सुपूर्द करण्यात आला. pic.twitter.com/SzNwyQwtJP
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) April 19, 2024
अधिक वाचा –
– चिंचवड आणि पनवेलची जनता ठरवणार ‘मावळ’चा नवा खासदार; दोन्ही मतदारसंघात तब्बल 11 लाख 61 हजार मतदार, वाचा अधिक
– ‘देवाकडे प्रार्थना करतो, ही महायुती टिकून राहावी… पुढच्या 6 महिन्यांनंतर काय होईल ते माहिती नाही’ – आमदार सुनिल शेळके
– महत्वाची बातमी ! ‘वंचित’कडून मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी, ‘ह्या’ नावांचा प्राधान्याने विचार सुरु