शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मावळ लोकसभा संघटक पदी संजोग वाघेरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे प्रसिद्धीपत्रक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस, 30 डिसेंबर रोजी संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीररित्या प्रवेश केला होता. थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत संजोग वाघेरे शिवसेनेत दाखल झालेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संजोग वाघेरे पाटील हे पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जुणे जाणते नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. अजित पवार यांचे ते खंदे समर्थक मानले जात. त्यांची राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद भुषवले आहे. परंतू, आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. यामुळे एकीकडे अजित पवारांना मोठा धक्का बसलाय, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे जे की पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छक आहेत, त्यांचेही टेन्शन वाढले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजोग वाघेरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने उद्धव ठाकरे यांना मोठी ताकद मिळाली आहे. ( sanjog waghere appointed maval lok Ssbha organizer of shiv sena UBT Party )
संजोग वाघेरे यांच्या अनुभवाचा आणि वलयाचा ठाकरेंना मावळ लोकसभेसह आगामी महापालिका निवडणुकीतही पिंपरी-चिंचवड शहरासाठी फायदा पक्षाला होणार आहे. तर दुसरीकडे वाघेरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लगेचच मावळ लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कार्याची आणि तडफेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर मावळ लोकसभा संघटक पदाची जबाबदारी दिली आहे.
अधिक वाचा –
– “राम बहुजनांचा आहे..राम शिकार करुन मांसाहार करत होता..देशातील 80 टक्के मांसाहारी रामभक्त आहेत”
– दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान, वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय
– मावळसह पुणे जिल्ह्याचे नाव जगभर गाजवणारी सुवर्णकन्या तृप्ती निंबळे! वाचा वारू गावच्या लेकीचा आदर्शवत क्रीडाप्रवास